PKL 2019: राजकारणानंतर माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याचा कबड्डीच्या मैदानात 'ले पंगा', युपी योद्धा चा बनला ब्रँड अॅम्बेसेडर

एकेकाळी क्रिकेटचे मैदान गाजवलेल्या भारताचा माजी क्रिकटपटू आणि भारतीय जनता पार्टीचा खासदार गौतम गंभीरला प्रो कबड्डी लीगच्या सातव्या हंगामासाठी यूपी योद्धा संघाचा ब्रँड अँबेसेडर म्हणून घोषित करण्यात आले आहे.

गौतम गंभीर (Photo Credit: UP Yoddha/Twitter)

भारताचा माजी क्रिकटपटू आणि भारतीय जनता पार्टीचा (Bhartiya Janta Party) खासदार गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने आता क्रिकट आणि राजकारणाच्या मैदानासह अजून एका ठिकाणी पंगा घेतला आहे. एकेकाळी क्रिकेटचे मैदान गाजवलेल्या गंभीरला प्रो कबड्डी लीग (Pro Kabaddi League) च्या सातव्या हंगामासाठी यूपी योद्धा (UP Yoddha) संघाचा ब्रँड अँबेसेडर म्हणून घोषित करण्यात आले आहे. यूपी योद्धाने एक प्रोमो शेअर केला आहे यात गंभीर ब्रँड अँबेसेडर असल्याचे दिसून आले. ट्विटरवर हा प्रोमो शेअर करताना यूपी योद्धाने लिहिले की, "सर्व उत्तर प्रदेशची आन, बान आणि शान, भारताचा आवडता) गौतम गंभीर आणि यूपी योद्धा घेऊन येत आहे तूफान."

या प्रोमोमध्ये गंभीर यूपी योद्धाच्या अन्य खेळाडूंसह दिसत आहे. यासह गौतम गंभीरने देखील ट्विट करत लिहिले की, "यूपी योद्धाचा ब्रँड अँबेसेडर म्हणून अभिमान आहे."

यूपी योद्धाचा ब्रँड अँबेसेडर म्हणून अभिमान आहे

दरम्यान, यंदाच्या प्रो कबड्डी लीगमध्ये यूपी योद्धा संघाला त्यांच्या पहिल्या सामन्यात बंगाल वॉरियर्स संघाकडून 17 -48 पराभव पत्करावा लागला. दुसरीकडे, क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर गंभीरने राजकारणात उडी घेतली होती. गंभीर 2014 च्या लोक सभा निवडणुकीत भाजपाच्या तिकीटावर विजयी होऊन पूर्व दिल्लीचा खासदार झाला.