Youth Olympics 2018: पंधरा वर्षीय जेरेमी लालरीनुंगामुळे भारताला स्पर्धेत पहिलं सुवर्ण

वेटलिफ्टिंगच्या ६२ किलो वजनी गटात जेरेमीने एकूण २७४ किलो वजन उचललं.

Jeremy Lalrinnunga | File Photo | (Photo Credits- Twitter @Rajyavardhan Rathore)

अर्जेन्टिनाची राजधानी ब्युनोस ऐरेस येथे सुरु असलेल्या युथ ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारताच्या जेरेमी लालरीनुंगाने सुवर्ण पदक पटकावलं आहे. भारतासाठी हे पाहिलंच सुवर्ण पदक आहे. वेटलिफ्टिंगच्या ६२ किलो वजनी गटात जेरेमीने एकूण २७४ किलो वजन उचललं.

लालरीनुंगाच्या नावावर  यापूर्वी २७३ किलो वजन उचलल्याच्या सर्वोत्तम कामगिरीची नोंद होती. ही कामगिरी त्याने पटियालातील एका कार्यक्रमात गेल्याच महिन्यात केली होती. जेरेमी हा गेली २ वर्ष आर्मी ट्रैनिंग इन्स्टिटयूट येथे प्रशिक्षण घेत असून, त्याला भारतासाठी सिनियर ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकायचे आहे.

या स्पर्धेत भारताला आता पर्यंत एकूण ४ पदक मिळाले असून त्यात १ सुवर्ण आणि ३ रौप्य पदक आहेत.