CBSE 12वी बोर्ड परीक्षेत भारताच्या 17 वर्षीय कॉमनवेल्थ सुवर्णपदक विजेता नेमबाज अनीश भानवालची कमाल, मिळवले 90 टक्के गुण

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा सर्वात युवा चॅम्पियन अनीश भानवाला फक्त शूटिंगमधेच नाही तर अभ्यासातील त्याचे लक्ष्यदेखील पूर्ण करतो. सीबीएसई 12 वी बोर्ड परीक्षेत अनीशने आपल्या खेळाप्रमाणेच उत्कृष्ट कामगिरी करत 90 टक्के गुण मिळवले आहेत. अनीशमी स्वतः ट्वीट करून ही माहिती दिली आहे.

प्रतीकात्मक फोटो 

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा सर्वात युवा चॅम्पियन अनीश भानवाला (Anish Bhanwala) फक्त शूटिंगमधेच नाही तर अभ्यासातील त्याचे लक्ष्यदेखील पूर्ण करतो. सीबीएसई 12 वी बोर्ड परीक्षेत (CBSE 12th Board Exam) अनीशने आपल्या खेळाप्रमाणेच उत्कृष्ट कामगिरी करत 90 टक्के गुण मिळवले आहेत. अनीशमी स्वतः ट्वीट करून ही माहिती दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये अनीश कुटुंबासोबत मस्ती करताना आणि आपल्या शिक्षक आणि कुटुंबाचे आभार मानताना दिसत आहे. फाइन आर्ट्स (Fine Arts) क्षेत्रात 100 टक्के गुण मिळवल्याचेही अनिशने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. राष्ट्रकुल खेळामध्ये सुवर्णपदक जिंकणारा अनीश सर्वात कमी वयातील भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याने पुरुषांच्या 25 मीटर वेगवान फायरमध्ये चमकदार कामगिरी करून सुवर्ण पदक जिंकले आणि आता सध्या तो टोकियो ऑलिम्पिक कोटा मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. अनीश एक प्रतिभावान नेमबाज आहे.

2018 च्या आयएसएसएफ ज्युनियर वर्ल्ड कपमध्ये त्याने प्रत्येकाला कामगिरीने आश्चर्यचकित करून सुवर्ण पदक जिंकले. अनीशला आता टोकियो ऑलिम्पिकमध्ये पात्रता आणायची आहे, त्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. आपल्या मेहनतीच्या जोरावर तो टोकियो ऑलिम्पिकची पात्रता मिळवू शकेल असे याची या युवा भारतीय नेमबाजला खात्री आहे. "मला कोणत्याही किंमतीने खेळाशी संपर्क गमावायचा नाही. म्हणून मी फक्त सकारात्मक आणि आनंदी आहे. माझ्या दृष्टीने गोष्टी खूप चांगल्या प्रकारे जात आहेत, जरी नेमबाजीत अनेक चढ-उतार होत आहेत, सर्वांच्या बाबतीत असेच आहे असा माझा अंदाज आहे.”

दुसरीकडे, फक्त खेळातच नाही तर अनीश शिक्षणातही पुढे जाऊन पदव्युत्तर पदवी मिळवण्यासाठी इच्छूक आहे. पीटीआय अहवालानुसार, अनीश लवकरच बिझिनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन मधील बॅचलर्समध्ये पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेईल आणि त्यानंतर मास्टर करेल. “मी मानव रचना विद्यापीठातून अभ्यास करीन जे करणीसिंग शूटिंग रेंजच्या अगदी जवळ आहे. बीबीए नंतर मी एमबीए करेन. सुरक्षित भविष्यासाठी व्यावसायिक पदवी असणे चांगले आहे,” अनीशने पीटीआयला सांगितले. “पुढच्या वर्षी मार्च किंवा एप्रिलमध्ये विश्वचषक स्पर्धा होत आहे. मी आतापर्यंत बर्‍यापैकी चांगले प्रदर्शन केले आहे आणि माझ्यापेक्षा वरच्या क्रमांकावर असलेल्या सर्व नेमबाजांनी कोटा मिळविला आहे. म्हणून माझ्यासाठी आता एक चांगली संधी आहे,” राष्ट्रकुल क्रीडा आणि युवा विश्वचषकातील सुवर्णपदक विजेत्याने सांगितले.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now