जेम्स नाइस्मिथ Google Doodle: बास्केटबॉल खेळाचे जनक James Naismith यांच्या स्मणार्थ खास अ‍ॅनिमेटेड डूडल द्वारा गूगलची आदरांजली!

थंडीच्या दिवसांत मुलांना इनडोअर गुंतवून ठेवण्यासाठी या खेळाची निर्मिती झाली होती.

Google Doodle | Photo Credits: Google.com Homepage

गूगलने आज जेम्स नाइस्मिथ (James Naismith) यांच्या स्मरणार्थ खास डूडल बनवलं आहे. जेम्स नाइस्मिथ यांना बास्केटबॉल या खेळाचा संशोधक म्हटलं जातं. ते कॅनडियन-अमेरिकन शिक्षक, प्रोफेसर, डॉक्टर आणि कोच होते. आजच्या दिवशी म्हणजेच 15 जानेवारी 1891 रोजी त्यांनी त्यांनी बास्केटबॉलचा शोध लावला असं म्हटलं जातं. या खेळाच्या निर्मितीच्या 130व्या वर्षपूर्ती निमित्त गूगलने खास अ‍ॅनिमेशन सह डूडल बनवत त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाला मानवंदना दिली आहे.

शिक्षण आणि खेळ हा जेम्स नेइस्मिथ यांचा आवडीचा विषय असल्याने थंडीच्या दिवसांत मुलांना इनडोअर खेळ देत "athletic distraction" म्हणून बास्केटबॉल या खेळाचा त्यांनी आविष्कार केला. अमेरिकेच्या स्प्रिंगफिल्ड, मैसाचुसेट मध्ये वाईएमसीए इंटरनॅशनल ट्रेनिंग कॉलेजमध्ये नोकरी करत असतानाच त्यांनी बास्केटबॉलच्या खेळाच्या 13 नियमांची देखील खास निर्मिती केली होती. आरती साहा Google Doodle: भारतीय जलतरणपटू Arati Saha यांच्या 80 व्या जन्मदिनी गुगलने साकारले खास डूडल!

सॉकर, फूटबॉल, हॉकी या खेळाप्रमाणेच बास्केटबॉलचे नियम बनवण्यात आले. प्रत्येक टीम मध्ये 9-9 जणांचा समावेश करत हा खेळ खेळला जाऊ लागला. हळूहळू बास्केट बॉल या खेळाची लोकप्रियता वाढता गेली आणि 1936 साली जर्मनीच्या बर्लिनमध्ये झालेल्या ऑलंपिक खेळामध्ये त्याचा समावेश करण्यात आला. आज हा खेळ जगभर 200 देशांत खेळला जातो.दरम्यान वयाच्या 78 व्या वर्षी जेम्स नेइस्मिथ यांचे ब्रेन हॅमरेजने निधन झाले.

गूगल डुडल जगभर  महत्त्वाचे दिवस, सण समारंभ यांचं औचित्य साधत तसेच विविध क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करणार्‍या लोकांच्या स्मरणार्थ गूगल डूडल द्वारा आदरांजली अर्पण करत त्यांच्याप्रती कृतज्ञतेची भावना अर्पण करतो. बाबा आमटे, सावित्रीबाई फुले, पुल देशपांडे अशी महाराष्ट्राच्या मातीतील मोलाची रत्नं देखील गूगल डुडलवर यापूर्वी झळकली आहेत.