EURO Cup 2020: फ्रान्स संघाला बाहेरचा रस्ता दाखवत स्वित्झर्लंडने केला ‘हा’ भीमपराक्रम; स्पेनची क्रोएशियावर 5-3 ने मात

या सामन्यात एकूण 8 गोल झाले आणि स्पेनने क्रोएशियाला 5-3 ने पराभूत करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. दुसरीकडे, स्वित्झर्लंडने वर्ल्ड चॅम्पियन फ्रान्सला पेनल्टी शूटआऊटमध्ये 5-4 ने पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.

युरो 2020 स्पेन (Photo Credit: PTI)

EURO Cup 2020: युरो 2020 मध्ये स्पेन (Spain) आणि फिफा वर्ल्ड कप उपविजेता क्रोएशिया (Croatia) यांच्यात खेळलेल्या सामन्यात गोलचा पाऊस पाडला. या सामन्यात एकूण 8 गोल झाले आणि स्पेनने क्रोएशियाला 5-3 ने पराभूत करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. अतिरिक्त वेळेत अल्वारो मोराटा आणि मिकेल ओयर्झाबालच्या गोलच्या जोरावर स्पेन संघाने अंतिम-16 मध्ये स्थान मिळवले. राऊंड ऑफ 16 सामन्यात 8 गोल युरोच्या इतिहासातील दुसर्‍या क्रमांकाचा मोठा सामना ठरला आहेत. दुसरीकडे, सोमवारी युरो 2020 च्या अखेरच्या 16 सामन्यात स्वित्झर्लंडने (Switzerland) वर्ल्ड चॅम्पियन फ्रान्सला (France) पेनल्टी शूटआऊटमध्ये 5-4 ने पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. 2010 विश्वचषक स्पर्धेनंतर पहिल्यांदाच फ्रान्स मोठ्या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचण्यात अपयशी ठरला आहे. स्वित्झर्लंड संघाने 67 वर्षानंतर पहिल्यांदा मोठ्या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. (EURO 2020: रोनाल्डोच्या पोर्तुगालच्या प्रवासाला राऊंड ऑफ 16 मध्ये लागला ब्रेक, बेल्जियमकडून 0-1 ने झाला पराभूत)

2008 ते 2012 दरम्यान एक विश्वचषक आणि दोन युरो चषक जिंकणार्‍या स्पेन संघाचा प्रवास युरो 2016 वर्ल्ड कप 2018 मध्ये अंतिम-16 मधेच संपुष्टात आला होता. कोपेनहेगनमधील पार्केन स्टेडियममध्ये झालेल्या स्पेन आणि क्रोएशिया सामन्यात दोन्ही टीमने सावध सुरुवात केली होती, परंतु 20व्या मिनिटाला स्पेनच्या पेड्रीच्या आत्मघाती गोलमुळे क्रोएशियाने आघाडी घेतली, ज्याची पाब्‍लोने 38 व्या मिनिटाला गोल करत बरोबरी केली. 76वें मिनट तक स्‍पेन ने केसार और टोरेस के गोल के दम पर 3-1 से बढ़त हासिल कर ली थी. क्रोएशियाच्या मिस्लावने 85 व्या मिनिटाला आणि मारिओने 92 व्या मिनिटाला दोन गोल करून 3-3 अशी बरोबरी केली. या हाय-व्होल्टेज सामन्यात 100 व्या मिनिटाला अल्वारो आणि 103 व्या मिनिटाला माइकलने आणखी दोन गोल करून सामना स्पेनला विजय मिळवून दिला आणि यासह क्रोएशियाचा प्रवास संपुष्टात आला.

स्वित्झर्लंड आणि फ्रान्स संघातील सामन्याबद्दल बोलायचे तर सामन्याचा पहिला गोल 15व्या मिनिटाला स्वित्झर्लंडने केला. पहिला हाफ स्विस संघाने या एका गोलासह संपुष्टात आला. पण उत्तरार्ध गोलने भरलेला होता. दुसर्‍या हाफमध्ये एकूण 5 गोल झाले त्यापैकी 3 फ्रान्सने आणि उर्वरित 2 गोल स्वित्झर्लंडने केले. खेळाच्या शेवटच्या क्षणी गवरानोविचने स्वित्झर्लंडकडून तिसरा गोल केला आणि सामना बरोबरीत सुटला. अतिरिक्त वेळेत एकही गोल झाला नाही त्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये स्वित्झर्लंडने 5-4 ने बाजी मारली व विश्वविजेते संघाच्या मायदेशी परतीचा रास्ता मोकळा केला. दरम्यान, शुक्रवारी उपांत्यपूर्व फेरीत स्वित्झर्लंडचा सामना स्पेनशी होईल.