CWG 2022: एकेरी स्पर्धेतील भारताची पहिल्या पदकाची कमाई, तर 3 गोल्ड आणि 3 कास्यंपदक पटकावतं कॉमनवेल्थ गेम्सच्या नवव्या दिवशीही भारताचा बोलबाला

भारताने काल 3 सुवर्ण आणि 3 कास्यंपदकांची कमाई केली आहे.

Commonwealth Games 2022 (Photo Credit: Twitter/File photo)

कॉमनवेल्थ गेम्सचा (Commonwealth Games 2022) नववा दिवस भारतासाठी विशेष ठरला. कारण भारताने एकेरी स्पर्धेतील पहिल्या पदकाची कमाई केली. पॅरा टेबल टेनिस (Para Table Tennis) महिला एकेरीत भारताच्या सोनलबेन पटेलने (Sonalben Patel) इंग्लंडच्या (England) स्यू बेलीचा 3-5 असा पराभव करत कांस्यपदक आपल्या नावी नोंदवलं. भारताचं कॉमनवेल्थ गेम्स 2022 मधील हे एकेरी स्पर्धेतीलं पहिलं पदक आहे.  तरी कांस्यपदक (Bronze Medal) विजेती सोनलबेन पटेलने तिचं हे पदक तिचे पती, कुटुंब, प्रशिक्षक आणि सर्व देशवासियांना समर्पित करते अशी प्रतिक्रीया दिली आहे.

 

एवढंच नाही तर काल भारताने (India) आपल्या नावी 3 सुवर्णपदकं (Gold Maedal) देखील नोंदवली आहेत. पॅरा टेबल टेनिस आणि कुस्ती या दोन खेळात भारतीय खेळाडूंनी त्याच्या नावी 3 सुवर्णपदक नोंदवली आहेत. याचबरोबर भारताने काल दोन कास्यंपदकाची कमाई देखील केली आहे. टेबल टेनिस महिला एकेरी वर्गात 3-5 असा स्कोअर करत भारताच्या भाविनाबेन पटेलने सुवर्णपदक आपल्या  नावी नोंदवले आहे. तर कुस्तीपटू नवीन (Wrestler Naveen) आणि विनेश फोगाट (Vinesh Phogat) यांनी देखील सुवर्णपदकाची कमाई केली आहे. तसेच कुस्तीपटू दिपक नेहरा (Wrestler Depak Nehra) आणि बॉक्सर मोहम्मद हिसामूद्दीन (Boxer Mohammad Hussamuddin)  यांनी उत्तम प्रदर्शन करत कास्यंपदक पटकावलं आहे. (हे ही वाचा:- CWG 2022: भारतीय कुस्तीपटूंची कमाल; दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कास्यं पदकाची कमाई!)

 

भारतीय खेळाडूंनी (Indian Players) दमदार खेळ दाखवत सहा पदकं खिशात घातली आहेत. यंदाच्या कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतीय खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये असून दरदिवशी मोठ्या संख्येत पदक पटकावली आहेत. यंदा कुस्ती (Wrestling), वेटलिफ्टींग(Wet Lifting), टेबल टेनिससह (Table Tennis) बॅडमिंटनमध्ये (Badminton) देखील भारतीय खेळाडूंचं उत्तम प्रदर्शन बघायला मिळालं.