टोकियो ऑलिम्पिकमधील सुवर्णपदकानंतर Neeraj Chopra चे अजून एक स्वप्न झाले पूर्ण; फोटो पोस्ट करून दिली आनंदाची बातमी (See Photos)
भालाफेकमध्ये भारतासाठी ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या नीरजने शनिवारी ट्विट करून आपल्या नव्या स्वप्नाबाबत आनंद व्यक्त केला
टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचणाऱ्या भारतीय खेळाडू नीरज चोप्राचे आणखी एक स्वप्न पूर्ण झाले आहे. भालाफेकमध्ये भारतासाठी ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या नीरजने शनिवारी ट्विट करून आपल्या नव्या स्वप्नाबाबत आनंद व्यक्त केला. नीरजने चार्टर्ड फ्लाइटमध्ये त्याच्या पालकांसोबत एक फोटो शेअर केला. आपल्या आई-वडिलांना विमानप्रवास घडवणे हे नीरज चोप्राचे एक स्वप्न होते जे आज पूर्ण झाले आहे. तो त्याच्या आई-वडिलांसोबत विमानात बसून खूप आनंदी दिसत आहे.
त्याने याचे फोटो शेअर केले आहेत. त्याने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे- 'आज आयुष्याचे एक स्वप्न पूर्ण झाले जेव्हा मला माझे आई-वडील पहिल्यांदा फ्लाइटमध्ये बसलेले दिसले. प्रत्येकाच्या प्रार्थना आणि आशीर्वादांसाठी मी नेहमीच कृतज्ञ राहीन.’ नीरजच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करून त्याचे अभिनंदन केले आहे.
नीरजने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. त्याने एथलेटिक्समध्ये 87.58 मीटर थ्रोसह प्रथमच भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये एकूण 7 पदके जिंकली, ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी होती. सुवर्णपदक जिंकल्यानंतर नीरज स्टार बनला आहे. अलीकडेच पुण्यात नव्याने बांधण्यात आलेले स्टेडियमला नीरज चोप्राचे नाव देण्यात आले आहे. (हेही वाचा: Lionel Messi Hat-trick: मैदानावर हॅटट्रिक करत लिओनेल मेस्सीने पेलेचा मोडला विक्रम, आनंदाने कोसळले रडू)
टोकियोहून परतल्यानंतर नीरजची व्यस्तता वाढली आहे. तो वेगवेगळ्या ठिकाणी सतत सन्मान कार्यक्रमाला हजेरी लावताना दिसत आहे. या सगळ्यामुळे तो आपल्या कुटुंबालाही वेळ देऊ शकत नाही. मात्र, गेल्या महिन्यात त्याने सांगितले होते की, कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी 2021 मध्ये होणाऱ्या अनेक स्पर्धांमध्ये तो सहभागी होणार नाही. पण 2022 मध्ये आशियाई आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेईल.