क्रिस्टियानो रोनाल्डोची गर्लफ्रेंड जॉर्जिना रोड्रिग्सला मोठा धक्का, स्पेनच्या इन्स्टाग्राम सर्वाधिक फॉलोअर्स यादीत 'या' Netflix अभिनेत्रीने हिसकावले अव्वल स्थान
यापूर्वी जॉर्जिना स्पेनमध्ये सर्वाधिक फॉलोअर्स असलेली सुंदरी मानली जायची पण आता नेटफ्लिक्सवर 'एलिट' नावाच्या स्पॅनिश सिरीजमध्ये इस्टर एक्सपोजिटोने हा मान मिळवला आहे.
क्रिस्टियानो रोनाल्डोची (Cristiano Ronaldo) गर्लफ्रेंड जॉर्जिना रोड्रिग्सकडून (Georgina Rodríguez) 20 वर्षीय अभिनेत्रीने स्पेनची इन्स्टाग्राम क्वीन म्हणून अव्वल स्थान हिसकावून घेतले आहे. क्रीडा जगातील प्रसिद्ध फुटबॉलपटू रोनाल्डोची संपत्तीची नेहमीच चर्चा रंगते. जगभरात सर्वाधिक इंस्टाग्राम फॉलोअर्स आलेल्या खेळाडूंमध्ये रोनाल्डो अव्वल स्थानावर आहे, पण त्याच्या गर्लफ्रेंडला या बाबतीती आता एका युवा अभिनेत्रीने पछाडले आहे. यापूर्वी जॉर्जिना स्पेनमध्ये सर्वाधिक फॉलोअर्स असलेली सुंदरी मानली जायची पण आता नेटफ्लिक्सवर 'एलिट' नावाच्या स्पॅनिश सिरीजमध्ये इस्टर एक्सपोजिटोने (Ester Exposito) हा मान मिळवला आहे. इस्टर या सिरीजमध्ये मुख्य भूमिकेत आहे. जॉर्जिनाचे इंस्टाग्रामवर 17.7 मिलियन फॉलोअर्स आहेत तर इस्टरचे 20 मिलियन फॉलोअर्स आहेत. इस्टरने रोनाल्डोच्या गर्लफ्रेंडचा ताज रेगेटन डान्स आणि मिड्रिफ दाखवून घेतले.
'द सन'मध्ये दिलेल्या वृत्तानुसार, इस्टरचा हा व्हिडिओ आजवर तब्बल 42.8 मिलियन वेळा लोकांनी पहिला आहे. तिच्या या सेक्सी डान्सने तिच्या फॉलोअर्सची संख्या 20 मिलियन पर्यंत नेली. ही रोनाल्डोची गर्लफ्रेंड जॉर्जिना तीन मिलियन जास्त आहे. पाहा इस्टरचा तो व्हिडिओ:
View this post on Instagram
Vamosssss con ese sábado nocheeeeeee
A post shared by Ester Expósito (@ester_exposito) on
दरम्यान, सोमवारी रोनाल्डोच्या गर्लफ्रेंडने पलंगावर फुटबॉलर आणि मुलांसह घेतलेला सेल्फी शानदार कॅप्शनसह शेअर केला हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताना रोनाल्डोने लिहिले की दिवस सुरू करण्याचा हा उत्तम मार्ग आहे. आणि काही क्षणातच हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. युवेन्ट्सचा स्टार खेळाडू रोनाल्डो सध्या क्वारंटाईनचा खूप आनंद घेत आहे. यापूर्वी, रोनाल्डोने गर्लफ्रेंड जॉर्जिनाकडून केस कप्तानाचा व्हिडिओ शेअर केला होता. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भामुळे स्पेनमध्ये सध्या लॉकडाउन आहे, त्यामुळे सर्व पार्लर आणि सलून सर्व बंद आहेत.