National Sports Awards 2021: राष्ट्रपतींच्या हस्ते आज राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2021 चे वितरण, येथे पहा विजेत्यांची लिस्ट

राष्ट्रीय खेलरत्न पुरस्कार (Photo Credits-File Image)

National Sports Awards 2021:  राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज ( 13 नोव्हेंबर 2021) रोजी राष्ट्रपती भवन येथे आयोजित विशेष सोहळ्यात 2021 या वर्षाच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचे वितरण करणार आहेत. युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने 2  नोव्हेंबर 2021 रोजी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर केले होते. क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल दरवर्षी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार दिले जातात. मागील चार वर्षे क्रीडा क्षेत्रात दिमाखदार आणि  उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या क्रीडापटूला  मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार दिला जातो.

खेळात तसेच क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय क्रीडा कामगिरीसाठी दिले जाणारे अर्जुन पारितोषिक हे मागील चार वर्षातील चांगली कामगिरी आणि नेतृत्वगुण, खिलाडू वृत्ती आणि शिस्तपालन करणाऱ्याला दिले जाते.क्रीडा आणि क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट मार्गदर्शन करणाऱ्या क्रीडा शिक्षकांना त्यांनी सलगपणे केलेली गुणवत्तापूर्ण कामगिरी तसेच क्रीडापटूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये कामगिरी उंचावण्यासाठी घेतलेली मेहनत यासाठी द्रोणाचार्य पुरस्कार दिले जातात.

खेळ व क्रीडा स्पर्धातील कामगिरीसाठी दिला जाणारा ध्यानचंद जीवन गौरव म्हणजेच लाईफ टाईम अचीवमेंट हा पुरस्कार आपल्या खेळातील कामगिरीने क्रीडा क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या आणि खेळातील निवृत्ती नंतरही क्रीडा क्षेत्रात खेळासाठी योगदान देणाऱ्यांना दिला जातो.

राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार

खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या, क्रीडा नियंत्रण मंडळे, राज्य पातळीवरील तसेच राष्ट्रीय पातळीवरील क्रीडा संघ याशिवाय स्वयंसेवी संस्था ज्यापैकी क्रीडा क्षेत्रात लक्षणीय भूमिका बजावणाऱ्यांसाठी राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार दिले जातात.

आंतरविद्यापीठीय सामन्यांमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या विद्यापीठाला मौलाना अबुल कलाम आझाद (MAKA)ट्रॉफी दिली जाते.

या पुरस्कारांसाठी या वर्षी मोठ्या संख्येने नामांकने प्राप्त झाली होती. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती मुकुंदकम शर्मा यांच्या नेतृत्वाखालील ख्यातनाम क्रीडापटू आणि क्रीडा पत्रकारिता व क्रीडा व्यवस्थापन यामधील अनुभवी व्यक्तींच्या निवड समितीने त्यांची छाननी केली.

>>'या' पुरस्कारांच्या मानकऱ्यांची माहिती पुढीलप्रमाणे:-

(i)मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार 2021

S. No. Name of the Sportsperson Discipline
1. Neeraj Chopra Athletics
2. Ravi Kumar Wrestling
3. LovlinaBorgohain Boxing
4. Sreejesh P.R Hockey
5. AvaniLekhara Para Shooting
6. SumitAntil Para Athletics
7. Pramod Bhagat Para Badminton
8. Krishna Nagar Para Badminton
9. Manish Narwal Para Shooting
10. Mithali Raj Cricket
11. Sunil Chhetri Football
12. Manpreet Singh Hockey

(ii) 2021 या वर्षात क्रीडा व क्रीडा स्पर्धातील नेत्रदीपक कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार

S. No. Name of the Sportsperson Discipline

Arpinder Singh Athletics

Simranjit Kaur Boxing

Shikhar Dhawan Cricket

Bhavani Devi ChadalavadaAnandhaSundhararaman Fencing

Monika Hockey

Vandana Katariya Hockey

Sandeep Narwal Kabaddi

HimaniUttamParab Mallakhamb

Abhishek Verma Shooting

Ankita Raina Tennis

Deepak Punia Wrestling

Dilpreet Singh Hockey

Harman Preet Singh Hockey

Rupinder Pal Singh Hockey

Surender Kumar Hockey

Amit Rohidas Hockey

Birendra Lakra Hockey

Sumit Hockey

Nilakanta Sharma Hockey

Hardik Singh Hockey

Vivek Sagar Prasad Hockey

Gurjant Singh Hockey

Mandeep Singh Hockey

Shamsher Singh Hockey

Lalit Kumar Upadhyay Hockey

Varun Kumar Hockey

Simranjeet Singh Hockey

Yogesh Kathuniya Para Athletics

Nishad Kumar Para Athletics

Praveen Kumar Para Athletics

SuhashYathiraj Para Badminton

SinghrajAdhana Para Shooting

Bhavina Patel Para Table Tennis

Harvinder Singh Para Archery

Sharad Kumar Para Athletics

(iii) क्रीडा आणि क्रीडा स्पर्धा 2021 मधील सर्वोत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शकांना दिले जाणारे द्रोणाचार्य पुरस्कार

  1. Life-Time Category:

S. No. Name of the Coach Discipline

T. P. Ouseph Athletics

Sarkar Talwar Cricket

Sarpal Singh Hockey

Ashan Kumar Kabaddi

Tapan Kumar Panigrahi Swimming

  1. Regular Category:

S. No. Name of the Coach Discipline

Radhakrishnan Nair P Athletics

Sandhya Gurung Boxing

Pritam Siwach Hockey

Jai Prakash Nautiyal Para Shooting

Subramanian Raman Table Tennis

(iv) खेळ आणि क्रीडा स्पर्धा 2021 मधील मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार

S.No. Name Discipline

Lekha K.C. Boxing

Abhijeet Kunte Chess

Davinder Singh Garcha Hockey

Vikas Kumar Kabaddi

Sajjan Singh Wrestling

(vi) राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार 2021

S. No. Category Entity recommended for Rashtriya Khel ProtsahanPuraskar, 2021
1. Identification and Nurturing of Budding and Young Talent Manav Rachna Educational Institution
2. Encouragement to sports through Corporate Social Responsibility Indian Oil Corporation Limited

(vii) मौलाना अबुल कलाम आझाद (MAKA) ट्रॉफी 2021

Panjab University - Chandigarh

S.Patil/V.Sahjrao/P.Malandkar