Mumbai Vs Vidarbha Ranji Trophy Final: रणजी फायनलमध्ये मुशीर खानचे शतक; मुंबईकडे 500 हून अधिक धावांची आघाडी

कर्णधार रहाणे 73 धावा करून बाद झाला. त्याचवेळी श्रेयस अय्यर 111 चेंडूंचा सामना करत 95 धावा करून बाद झाला.

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) 41 वेळची चॅम्पियन मुंबई आणि दोन वेळचा चॅम्पियन विदर्भ यांच्यात रणजी ट्रॉफीचा जेतेपदाचा सामना खेळला जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईने पहिल्या डावात 224 धावा केल्या. प्रत्युत्तरात विदर्भाचा पहिला डाव 105 धावांत आटोपला. सर्फराज खानचा धाकटा भाऊ मुशीर खान (Musheer Khan Century) याने रणजी ट्रॉफी 2024 (Ranji Trophy Final 2024) च्या अंतिम सामन्यात शानदार शतक झळकावले. विदर्भाविरुद्धच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळात मुशीर खानने शतक झळकावून महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा 29 वर्ष जुना विक्रम मोडला आहे.  (हेही वाचा - )

पाहा व्हिडिओ -

सर्फराजचा भाऊ मुशीर खान याने वयाच्या 19 वर्षे 14 दिवसांत रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये शतक झळकावले, तर सचिनने 21 वर्षे 10 महिन्यांत ही कामगिरी केली होती. त्यावेळी सचिनने 1994-94 च्या रणजी मोसमात पंजाबविरुद्ध द्विशतक झळकावले होते.

मुंबईच्या खराब सुरुवातीनंतर मुशीर खान आणि कर्णधार अजिंक्यने संघाच्या डावाची धुरा सांभाळली. कर्णधार रहाणे 73 धावा करून बाद झाला. त्याचवेळी श्रेयस अय्यर 111 चेंडूंचा सामना करत 95 धावा करून बाद झाला. वृत्त लिहिपर्यंत मुशीर खान सध्या 137 धावा करुन बाद झाला. सध्या मुंबईकडे 537 धावांची आघाडी आहे. मुंबईने दुसऱ्या डावात मुंबईची धावसंख्या 9 बाद 418 धावा झाल्या आहेत.