IPL Auction 2025 Live

Mumbai Shree 2020 साठी 200 शरीरसौष्ठवपटू आजपासून भिडणार; अंधेरी लोखंडवाला कॉम्पलेक्स मध्ये रंगणार स्पर्धा

अंधेरी येथील लोखंडवाला कॉम्पलेक्स सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लब मध्ये आज संध्याकाळ पासून ही स्पर्धा रंगणार आहे.

Mumbai Shree, Image For Representations (Photo Credits-Facebook)

शरीरसौष्टवांसाठी मानाची मानली जाणाऱ्या 'मुंबई श्री' (Mumbai Shree) स्पर्धेचे यंदाचे पर्व आज, शुक्रवार 28 फेब्रुवारी पासून सुरु होणार आहे. अंधेरी येथील लोखंडवाला कॉम्पलेक्स सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लब मध्ये आज संध्याकाळ पासून ही स्पर्धा रंगणार आहे. बहृन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई उपनगर शरीर सौष्ठव आणि फिटनेस संघटनतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते, प्राप्त माहितीनुसार, यंदा 55 ते 90 अशा  9 गटातील तब्बल 200 शरीरसौष्ठव या स्पर्धेत भाग घेणार आहे. याशिवाय पुरुषांच्या फिटनेस फिजिक प्रकारातही 100 हुन अधिक स्पर्धक सहभागी होणार आहेत.

प्राप्त माहितीनुसार, मागील वर्षी या स्पर्धेत विजय मिळवू न शकलेल्या स्पर्धकांना सुद्धा यंदा सहभाग घेता येणार असल्याने गतवर्षीचे तगडे स्पर्धक सुशील मुरकर, सुशांत रांजणकर, उमेश गुप्ता, नीलेश दगडे सुद्धा यंदा कसून तयारीने स्पर्धेत उतरणार आहेत. त्यामुळे साहजिकच यंदाची स्पर्धा ही अटीतटीची होणार यात संशय नाही.

दरम्यान, मागील वर्षी या स्पर्धेत मुंबई श्री पदाचा मानकरी अनिल बिलावा ठरला होता तर डॉ. मंजिरी भावसार हिने 'मिस मुंबई' चे पद जिंकले आहे. या अंतिम विजेत्या मुंबई श्री ला आठ लाख रुपयांचे बक्षीस देऊन गौरवण्यात आले होते. यंदाच्या स्पर्धेत हा मान कोण पटकावते हे बघणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.