IPL 2021: क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्याची अबू धाबीतील हॉटेलमध्ये जोरदार एंन्ट्री, व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल
ज्यात दोघेही स्टाईलने एंट्री करताना दिसत आहेत.
स्टार भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि त्याचा भाऊ कृणाल पांड्या (Krunal Pandya) यांचा एक व्हिडिओ (video) सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल (Viral) होत आहे. ज्यात दोघेही स्टाईलने एंट्री करताना दिसत आहेत. वास्तविक, हे दोन्ही भाऊ आयपीएल 2021 (IPL 2021) च्या दुसऱ्या सहामाहीत मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) संघात सामील झाले आहेत. हार्दिक पंड्या आणि त्याचा भाऊ कृणाल पंड्या ज्या पद्धतीने अबू धाबीतील (Abu dhabi) एका हॉटेलमध्ये शिरले. ते पाहून चाहत्यांना सोशल मीडियावर खूप प्रतिक्रिया येऊ लागल्या. मुंबई इंडियन्स संघ 13 ऑगस्टला यूएईला पोहोचला आणि 20 ऑगस्टपासून अबू धाबीच्या शेख जायद स्टेडियमवर सराव सुरू करेल. कृणाल पंड्याने भाऊ हार्दिकसोबत स्वतःचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला, त्यानंतर चाहत्यांनी ट्विटरवर दोन्ही भावांना त्यांच्या स्टाईलसाठी ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
कोविड 19 साथीच्या पार्श्वभूमीवर या वर्षी मे मध्ये पुढे ढकलण्यात आला होता. आता 14 वा हंगाम दुबईमध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील ब्लॉकबस्टर संघर्षासह 19 सप्टेंबर रोजी पुन्हा सुरू होईल. यावर हमारे पंड्या बंधू आ गये, असे मुंबई इंडियन्सने ट्विट केले आहे. मुंबई इंडियन्स आणि CSK या महिन्याच्या सुरुवातीला UAE मध्ये पोहोचले आणि त्यांनी प्रशिक्षण सुरू केले आहे.
हार्दिक पंड्याने त्याच्या प्रवेशाचा व्हिडिओ सोशल मीडियावर स्टाईलसह शेअर केला आहे. मग काय होते, हे दोन भाऊ चाहत्यांच्या निशाण्याखाली आले. आयपीएल 2021 च्या पूर्वार्धात हार्दिक पंड्याची कामगिरी काही विशेष नव्हती. हार्दिक पंड्याने 7 सामन्यांमध्ये 8.66 च्या सरासरीने 52 धावा केल्या. या दरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या फक्त 16 धावा होती.
गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर त्याने एकही षटक टाकले नाही. आता हार्दिक पंड्याचे काही चाहते आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यात उत्साहित आहेत. आयपीएल 2021 चा हा हंगाम हार्दिक पंड्याचा मोठा भाऊ कुणाल पंड्यासाठीही चांगला राहिला नाही. या डावखुऱ्या अष्टपैलूने आयपीएलच्या 7 सामन्यांमध्ये 100 धावा केल्या होत्या. आयपीएलचा दुसरा भाग 1 सप्टेंबरपासून सुरू होईल.