Zimbabwe vs Afghanistan, 3rd T20I Match 2024 1st Inning Scorecard: तिसऱ्या T20 सामन्यात अफगाणिस्तानने झिम्बाब्वेचा डाव अवघ्या 127 धावांत गुंडाळला, राशिद खानने 4 घेतले बळी; पहिल्या डावाचे स्कोअरकार्ड येथे पहा
तिसऱ्या T20 सामन्यात अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या झिम्बाब्वे संघाची सुरुवात निराशाजनक झाली आणि अवघ्या सहा धावांवर संघाला पहिला मोठा धक्का बसला.
Zimbabwe National Cricket Team vs Afghanistan National Cricket Team, 3rd T20 Match 2024 1st Inning Scorecard Update: झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील (T20 Series) तिसरा आणि निर्णायक सामना आज म्हणजेच 14 डिसेंबर रोजी खेळवला जात आहे. उभय संघांमधील हा सामना हरारे (Harare) येथील हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये (Harare Sports Club) खेळला जात आहे. दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात अफगाणिस्तानने झिम्बाब्वेचा 50 धावांनी पराभव केला आहे. यासह अफगाणिस्तानने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. या मालिकेत झिम्बाब्वेची कमान सिकंदर रझाकडे (Sikandar Raza) आहे. तर अफगाणिस्तानचे नेतृत्व राशिद खान (Rashid Khan) करत आहे. (हेही वाचा - South Africa vs Pakistan 3rd T20I 2024 Match Winner Prediction: दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात होणार चुरशीची लढत, सामन्यापूर्वी जाणून घ्या कोणता संघ जिंकू शकतो)
पाहा पोस्ट -
Zimbabwe all-out for 127 #ZIMvAFG pic.twitter.com/Nzy3ktfkb9
— Caught & Bowled (@caught1bowled) December 14, 2024
दरम्यान, तिसऱ्या T20 सामन्यात अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या झिम्बाब्वे संघाची सुरुवात निराशाजनक झाली आणि अवघ्या सहा धावांवर संघाला पहिला मोठा धक्का बसला.
झिम्बाब्वेचा संघ 19.5 षटकात केवळ 127 धावांवरच मर्यादित राहिला. झिम्बाब्वेकडून ब्रायन बेनेटने 31 धावांची सर्वोत्तम खेळी खेळली. या शानदार खेळीदरम्यान ब्रायन बेनेटने 24 चेंडूत चार चौकार मारले. ब्रायन बेनेटशिवाय वेस्ली मधवेरेने 21 धावा केल्या.
दुसरीकडे नवीन-उल-हकने अफगाणिस्तान संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. अफगाणिस्तानकडून कर्णधार राशिद खानने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. रशीद खानशिवाय नवीन-उल-हक, मुजीब उर रहमान आणि अजमतुल्ला उमरझाई यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी अफगाणिस्तान संघाला 20 षटकात 128 धावा करायच्या आहेत. हा सामना जिंकून अफगाणिस्तान संघाला मालिकेत झिम्बाब्वेचा क्लीन स्वीप करायचा आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

