Yuzvendra Chahal Spotted with Mystery Girl: धनश्री वर्मासोबत घटस्फोटांच्या चर्चांदरम्यान युजवेंद्र चहल दिसला 'या' मिस्ट्री गर्लसोबत (See Pics)

युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्यात सध्या सर्व काही ठीक नाही. त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. एकीकडे काही दिवसांपूर्वी धनश्रीचा दुसऱ्या व्यक्तीसोबत फोटो व्हायरल झाल्यानंतर आता युजवेंद्र चहलदेखील एका मिस्ट्री गर्लसोबत दिसला. त्याचे फोटो व्हायरल झाले आहेत.

Photo Credit- X

Yuzvendra Chahal Spotted with Mystery Girl: क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी तसेच कोरिओग्राफर धनश्री वर्मा (Dhanashree Verma) हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या घटस्फोटांच्या चर्चांमुळे प्रकाश झोतात आहेत. या सर्व गोष्टी एकीकडे सुरू असतानाच चहलचे (Yuzvendra Chahal) ख्रिसमस सेलिब्रेशनचे फोटो व्हायरल झाले आहेत. ज्यामुळे आता त्याचे बाहेर कुठे काही चालू आहेत असे बोलले जात आहे. दोघांचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. अनेकांनी फोटोत असणारी ती मुलगी आरजे महवश (RJ Mahvash)असल्याचे सांगतिले आहे. तिने देखील ते फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवर टाकले आहेत. (Yuzvendra Chahal and Dhanashree Verma Divorce: 'नवं आयुष्य सुरु...' युजवेंद्र चहल-धनश्री वर्मा घेतायत काडीमोड? समोर आली मोठी अपडेट)

आरजे महवश कोण आहे?

ही एक आघाडीचे रेडिओ जॉकी आहे. तिने एजेके मास कम्युनिकेशन रिसर्च सेंटरमधून शिक्षण घेतले आहे. या संस्थेतून शाहरुख खान, बरखा दत्त आणि कबीर खान सारख्या उल्लेखनीय कलाकारांचे शिक्षण झाले आहे. अवघ्या 24 व्या वर्षी महवशने तिच्या अपवादात्मक गायन प्रतिभेने रेडिओच्या जगात एक महत्त्वाचा ठसा उमटवला आहे.

इंस्टाग्रामवर 1.4 दशलक्ष फॉलोअर्स 

मिळालेल्या माहितीनुसार, आरजे महवशला बिग बॉस 14, बॉलिवूड चित्रपट आणि नेटफ्लिक्स शोमध्ये कामाच्या मोठ्या ऑफर आल्या आहेत. मात्र, तिने त्यांना नकार देऊन रेडिओमधेच करीअर करण्याला प्राधान्य दिले आहे. आज, तिचे इंस्टाग्रामवर 1.4 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.

दोघांचे ख्रिसमस सेलिब्रेशनचे फोटो व्हायरल 

 

 
 
 

View this post on Instagram

 
 
 

 

A post shared by Mahvash (@rj.mahvash)

चहलने धनश्रीसोबतचे फोटोही इन्स्टावरुन हटवले

क्रिकेपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा विभक्त होणार असल्याची चर्चा आहे. 2020 मध्ये लग्न झालेल्या या जोडप्यामधील घटस्फोटाची अटकळ, तेव्हा तीव्र झाली, जेव्हा दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले. चहलने पत्नीसोबतचे फोटोही इन्स्टावरुन हटवले आहेत. मुंबईतील एका हॉटेलमध्ये चहल एका अनोळखी महिलेसोबत दिसल्याच्या बातमीने आणखीनच चर्चांना उधाण आले आहे. ज्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now