Yuzvendra Chahal and Dhanashree Verma Divorce: 'नवं आयुष्य सुरु...' युजवेंद्र चहल-धनश्री वर्मा घेतायत काडीमोड? समोर आली मोठी अपडेट
Yuzvendra Chahal and Dhanashree Verma Divorce: क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा (Dhanashree Verma) यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी दोघांनी एकमेकांना इंस्टाग्रामवर अनफॉलो केलं होतं. युझवेंद्रनं (Yuzvendra Chahal )धनश्रीसोबतचे सर्व फोटोही इंस्टाग्रामवरून डिलीट केले आहेत. इतकंच नाही तर धनश्रीनही युझवेंद्रला अनफॉलो केलं आहे, पण त्याचे फोटो काढलेले नाहीत. टाइम्स ऑफ इंडियाच्या सूत्रांनी घटस्फोटाच्या (Yuzvendra Chahal Dhanashree Verma Divorce)अफवा खऱ्या असल्याचं म्हटलं आहे. तसंच 'घटस्फोट अंतिम आहे, फक्त औपचारिक घोषणा होणे बाकी असल्याचही टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालात म्हटलं आहे.
धनश्रीनं 2023 मध्ये हटवल नाव
जरी टाइम्स ऑफ इंडियाच्या सूत्रांनी घटस्फोटाच्या अफवा खऱ्या असल्याचं म्हटलं आहे. तरी अद्याप दोघांनीही त्यावर काही म्हटलेलं नाही. त्यांचं वेगळं होण्याचं खरं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. मात्र. त्यांच्यात 2023 पासूनच दुरावा आला असल्याचे म्हटले जात आहे. धनश्रीनं 2023 मध्येच तिच्या इंस्टाग्राम नावावरुन 'चहल' हटवले होते. तेव्हाच त्यांच्यात काहीतरी बिघल्याच म्हटलं गेलं. नुकतीच युझवेंद्र चहलनही एक इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट केली, ज्यामध्ये लिहिलं होतं, 'नवं आयुष्य सुरु होत आहे.' त्यावेळी युझवेंद्रनं या अफवा फेटाळून लावत नोट जारी केली होती. अशा अफवांवर विश्वास ठेवू नका आणि पसरवू नका असं त्यानं त्याच्या चाहत्यांना सांगितलं होतं.
प्रत्येकालाच आपापल्या वेदाना माहिती
त्याशिवाय नव्या पोस्टमध्ये त्याने म्हटलयं की, 'घेतलेल्या कठोर मेहनतीमुळे व्यक्तीचे चारित्र्य प्रकाश झोतात येते. प्रत्येकाला आपापला प्रवास माहिती असतो. प्रत्येकालाच आपापल्या वेदाना माहिती असतात. यशापर्यंत पोहोचण्यासाठी आपण काय-काय केलंय हे प्रत्येकालाच माहिती असते. आपल्या आई-वडिलांना अभिमान वाटावा यासाठी प्रत्येकानेच कष्ट करून घाम गाळलेला असतो,' असं युझवेंद्र चहलने आपल्या इन्स्टाग्रामच्या स्टोरीमध्ये म्हटलंय.
2020 रोजी युझवेंद्र आणि धनश्रीचं लग्न झालं
11 डिसेंबर 2020 रोजी युझवेंद्र आणि धनश्रीचं लग्न झालं होतं. झलक दिखला जा 11 मध्ये धनश्रीनं तिची प्रेमकहाणी सांगितली होती. ती म्हणाली, 'लॉकडाऊन दरम्यान एकही सामने होत नव्हते आणि सर्व क्रिकेटपटू घरी बसून कंटाळले होते. त्यादरम्यान एक दिवशी युझवेंद्रन नृत्य शिकण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियावर त्यानं माझ्या डान्सचे व्हिडिओ पाहिले होते. पूर्वी मी नृत्य शिकवायचे. नृत्य शिकण्यासाठी तो माझ्याकडे आला आणि नातं पुढे सरकलं.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)