Gujarat Titans Retained Players List: गुजरात टायटन्सचे नशीब बदलणार, जाणून घ्या कोणते खेळाडू कायम आणि कोणाला सोडण्यात आले?
आता गुजरातने पुढील हंगामासाठी एकूण 13 खेळाडूंना कायम ठेवले आहे. WPL 2025 मिनी लिलावापूर्वी गुजरातकडे त्यांच्या पर्समध्ये 4.4 कोटी रुपये शिल्लक आहेत आणि त्यांना एक मजबूत संघ उभा करावा लागेल.
Gujarat Titans Retention List WPL 2025: गुजरात टायटन्सने महिला प्रीमियर लीग 2025 साठी त्यांची राखीव यादी जाहीर केली आहे. गुजरातचा संघ गेल्या दोन हंगामातील गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर होता. आता गुजरातने पुढील हंगामासाठी एकूण 13 खेळाडूंना कायम ठेवले आहे. WPL 2025 मिनी लिलावापूर्वी गुजरातकडे त्यांच्या पर्समध्ये 4.4 कोटी रुपये शिल्लक आहेत आणि त्यांना एक मजबूत संघ उभा करावा लागेल. (हेही वाचा - RCB Women Retained Players List WPL 2025: चॅम्पियन RCB ची रिटेंशन यादी जाहीर, स्मृती मानधनासह 14 खेळाडू कायम )
पहिल्या सत्रातील अपयशानंतर गुजरात टायटन्सने आपल्या संघात मोठे बदल केले होते. फलंदाजी मजबूत करण्यासाठी ऑस्ट्रेलियन खेळाडू फोबी लिचफील्ड आणि कॅथरीन ब्राइस यांना संघात सामील करण्यात आले. गोलंदाजीची फळी मजबूत करण्यासाठी मेघना सिंग, प्रिया मिश्रा आणि काशवी गौतम या तीन भारतीय खेळाडूंना संघात आणण्यात आले. दुर्दैवाने नव्या खेळाडूंच्या आगमनानेही संघाचे नशीब बदलले नाही. 13 खेळाडूंना कायम ठेवण्याबरोबरच 6 खेळाडूंनाही सोडण्यात आले आहे. स्नेह राणा, कॅथरीन ब्राइस, त्रिशा पूजिता, वेदा कृष्णमूर्ती, तरन्नुम पठाण आणि लिया ताहुहू यांना वगळण्यात आले आहे.
गुजरातसाठी गेल्या मोसमात, बेथ मूनीने 8 सामन्यात 47.5 च्या सरासरीने 285 धावा केल्या होत्या, परंतु तिच्याशिवाय इतर कोणताही फलंदाज तिला साथ देऊ शकला नाही. दुसरीकडे, तनुजा कंवर गोलंदाजीत चमकली, तिने आठ सामन्यांत 10 बळी घेतले. गुजरातची ही सर्वात मोठी समस्या आहे की संपूर्ण संघ काही निवडक खेळाडूंवर अवलंबून आहे. अशा स्थितीत लिलावात गुजरातला संघाचा पाया मजबूत करू शकतील अशा खेळाडूंवर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.
गुजरात टायटन्स रिटेंशन यादी: ॲशले गार्डनर, बेथ मुनी, डेलन हेमलता, हरलीन देओल, लॉरा वूलवर्थ, शबनम शकील, तनुजा कंवर, फोबी लिचफिल्ड, मेघा सिंग, काश्वी गौतम, प्रिया मिश्रा, लॉरेन चीटल, मन्नत कश्यप.
गुजरात टायटन्समधून मुक्त झालेले खेळाडूः स्नेह राणा, कॅथरीन ब्राइस, त्रिशा पूजाता, वेदा कृष्णमूर्ती, तरन्नुम पठाण आणि लिया ताहुहू.