World Cup 2023 Points Table: नेदरलँडच्या विजयामुळे भारत गुणतालिकेत अव्वल स्थानी, श्रीलंका तळाला
दक्षिण आफ्रिकेने पहिल्या दोन्ही सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवला होता. त्यामुळे त्यांचा रनरेट +2 पेक्षा जास्त होता. पण दक्षिण आफ्रिकेन आजचा सामना जिंकला असता तर सहा गुणांसह ते पहिल्या स्थानावर पोहचले असते.
धरमशालाच्या मैदानावर (Dharmshala Ground) यंदाच्या विश्वचषकातील (World Cup) दुसरा मोठा उलटफेर झाला आहे. नेदरलँडने (Netherlands) बलाढ्या दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) 38 धावांनी पराभव करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. दोन दिवसांपूर्वी अफगाणिस्तानने (Afganistan)गतविजेत्या इंग्लंडला (England) पराभवाचा धक्का दिला होता. नेदरलँडच्या विजयाचा फायदा टीम इंडियाला झाला आहे. नेदरलँडच्या विजयामुळे टीम इंडियाचे गुणतालिकेतील अव्वल स्थान कायम राहिले आहे. भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) या संघांचा अद्याप एकाही सामन्यात पराभव झालेला नाही. तर श्रीलंकेला (Srilanka) अद्याप एकही विजय मिळवता आला नाही. (हेही वाचा - NED Beat SA, ICC World Cup 2023: विश्वचषकातील सर्वात मोठा उलटफेर; नेदरलँडची साऊथ आफ्रिकेवर 38 धावांनी मात)
पाहा पोस्ट -
Netherlands secures their first points of the World Cup with a historic win against South Africa in Dharamsala.
India remains at the top of the table with better NRR. pic.twitter.com/dJg54S2z24
— CricTracker (@Cricketracker) October 17, 2023
दक्षिण आफ्रिकेने पहिल्या दोन्ही सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवला होता. त्यामुळे त्यांचा रनरेट +2 पेक्षा जास्त होता. पण दक्षिण आफ्रिकेन आजचा सामना जिंकला असता तर सहा गुणांसह ते पहिल्या स्थानावर पोहचले असते. भारतापेक्षा त्यांचा रनरेट तगडा होता. आता भारत आणि न्यूझीलंड यांचे पहिले आणि दुसरे स्थान कायम आहे. भारतीय संघाचे तीन सामन्यात सहा गुण झाले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या न्यूझीलंडचेही सहा गुण आहेत. दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांचे समान गुण आहेत. पण दक्षिण आफ्रिकेचा रनरेट चांगला असल्यामुळे चार गुणांसह ते तिसऱ्या स्थानावर आहेत. तर पाकिस्तानचा संघ चौथ्या क्रमांकावर आहे.
इंग्लंडचा संघ तीन सामन्यात दोन पराभवासह गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर आहेत. अफगाणिस्तान सहाव्या क्रमांकावर आहे. बांगलादेशचा संघ तीन सामन्यात दोन गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ दोन गुणांसह नवव्या तर नेदरलँडचा संघ आठव्या क्रमांकावर आहे. विश्वचषक विजेत्या श्रीलंकेला अद्याप विजयाचे खाते उघडता आले नाही. तीन सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. श्रीलंकेचा संघ शून्य गुणांसह दहाव्या स्थानावर आहे.
(The above story first appeared on LatestLY on Oct 18, 2023 09:04 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

