Women's T20 Challenge 2020: चमारी अटापट्टूचे धडाकेबाज अर्धशतक, हरमनप्रीत कौरची फटकेबाजी; सुपरनोव्हासचे ट्रेलब्लेझरला विजयासाठी 147 धावांचं तगडं आव्हान
ट्रेलब्लेझर आणि सुपरनोव्हास यांच्यातील आजच्या सामन्यात सुपरनोव्हास कर्णधार हरमनप्रीत कौरने टॉस जिंकला अशा स्थिती संघाने पहिले फलंदाजी करत 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून सलामी फलंदाज चमारी अटापट्टूच्या दमदार 67 धावांच्या बळावर 146 धावांपर्यंत मजल मारली आणि स्मृती मंधानाच्या ट्रेलब्लेझरला विजयासाठी 147 धावांचं तगडं आव्हान दिलं.
Women's T20 Challenge 2020: ट्रेलब्लेझर (Trailblazers) आणि सुपरनोव्हास (Supernovas) यांच्यात महिला टी-20 चॅलेंजचा आजचा सामना सध्या शारजाह क्रिकेट स्टेडियमवर (Sharjah Cricket Stadium) खेळला जात आहे. आजच्या सामन्यात सुपरनोव्हास कर्णधार हरमनप्रीत कौरने (Harmanpreet Kaur) टॉस जिंकला अशा स्थिती संघाने पहिले फलंदाजी करत 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून सलामी फलंदाज चमारी अटापट्टूच्या (Chamari Athapaththu) दमदार 67 धावांच्या बळावर 146 धावांपर्यंत मजल मारली आणि स्मृती मंधानाच्या ट्रेलब्लेझरला विजयासाठी 147 धावांचं तगडं आव्हान दिलं. हरमनप्रीतने 31 धावा केल्या. ट्रेलब्लेझरविरुद्ध आजच्या समन्यात सुपरनोव्हासने बॅटने दमदार कामगिरी केली. आटपट्टू आणि प्रिया पुनिया यांच्यातील पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारीने संघाला प्रभावी सुरुवात करून दिली. मात्र, ट्रेलब्लेझरला गोलंदाजांनी मोक्याच्या क्षणी पुनरागमन करून दिले आणि सुपरनोव्हासची गाडी धावांवर रोखली. ट्रेलब्लेझरसाठी सलमा खातून, झुलन गोस्वामी आणि हर्लीन देओल यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली. (Women's T20 Challenge: हरमनप्रीत कौरचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय, पाहा Playing XI)
टॉस जिंकून पहिले फलंदाजी करणाऱ्या सुपरनोव्हाससाठी श्रीलंकेच्या अटापट्टू आणि भारताच्या प्रिया पुनिया यांनी दमदार सुरुवात केली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 89 धावांची भागीदारी झाली असताना सलमा खातूनने प्रियाला दीप्ती शर्माकडे झेलबाद करत संघाला पहिले यश मिळवून दिले. प्रियाने 30 धावा केल्या. यानंतर अटापट्टूने आपल्या अर्धशतक पूर्ण केले. अटापट्टूने आपल्या डावात 5 चौकार आणि 4 गगनचुंबी षटकार मारत सर्वाधिक 67 धावा केल्या. जेमीमाह रॉड्रिग्जसाजूक अपयशाचे सत्र यंदा देखील सुरूच राहिले. अनुभवी झुलन गोस्वामीने अवघ्या 1 धावेवर माघारी धाडलं. हरमनप्रीतने नाबाद आणि शशिकला सिरीवर्डीनने नाबाद धावा केल्या.
दरम्यान, महिला टी-20 चॅलेंजच्या फायनलमध्ये पोहचण्यासाठी सुपरनोव्हासला आजच्या सामन्यात विजय मिळवणे गरजेचे आहे. यापूर्वी त्यांना स्पर्धेतील पहिल्या सामन्यात वेलॉसिटीविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. दुसरीकडे, ट्रेलब्लेझरचे फायनलमध्ये पोहचणे जवळपास निश्चित आहे. पण, त्यांना मोठ्या फरकाने पराभव टाळण्याची गरज आहे. ट्रेलब्लेझरचे नेतृत्व स्मृती मंधाना तर हरमनप्रीत कौर सुपरनोव्हासचे नेतृत्व करत आहे. हरमनप्रीतच्या नेतृत्वात सुपरनोव्हासने दोनदा स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहेत.