'तुम्ही इतके पाकिस्तानविरोधी का आहात?' ट्विटर युजरच्या प्रश्नावर गौतम गंभीरने दिलेले उत्तर तुमचेही मन जिंकेल (See Tweet)
ज्याच्यावर गंभीरने तुमचेही मन खुश होईल अशी प्रतिक्रिया दिली.
सध्या सुरू असलेल्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर, या परीक्षेच्या काळात सेलिब्रिटी आणि प्रसिद्ध क्रीडा खेळाडूंनी त्यांच्या चाहत्यांसह आणि फॉलोअर्सशी संपर्क साधण्यासाठी सोशल मीडियाची शक्ती वापरली. भारतीय जनता पार्टीचे (Bhartiya Janata Party)) खासदार आणि टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू व राजकारणी गौतम गंभीरने (Gautam Gambhir) मंगळवारी ट्विटरवर प्रश्न-उत्तराचे सत्र आयोजित करून सोशल मीडिया बॅन्डवॅगनमध्ये सामील झाले. दोन वर्ल्ड कप विजेत्या टीमचे सदस्य असलेल्या गंभीरने क्रिकेटमधून निवृत्तीनंतर 2019 मध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद आणि दिवंगत अरुण जेटली यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्याने लोकसभा निवडणूक लढवली जिथे देखील त्यांनी विजय मिळवला. दरम्यान, गंभीरच्या प्रश्न-उत्तर सत्राबद्दल बोलायचे तर एका ट्विटरच्या युजरने गंभीरवर पाकिस्तानविरोधी (Anti-Pakistan) असल्याचा आरोप केला. ज्याच्यावर गंभीरने तुमचेही मन खुश होईल अशी प्रतिक्रिया दिली.
"तुम्ही पाकिस्तानविरोधी असे का आहात???," ट्विटर यूजरने ट्विटरवरील नुकत्याच झालेल्या प्रश्न-उत्तर सत्रामध्ये गंभीरला प्रश्न विचारला. ट्विटर यूजरच्या प्रश्नाची दखल घेत माजी भारतीय क्रिकेटपटूने योग्य प्रतिसाद दिला. "मी नाही! मला वाटत नाही की कोणी भारतीय असेल. पण जेव्हा आपल्याला आपल्या सैनिकांचे जीवन आणि इतर काहीही निवडायचे असते, तेव्हा आपण सर्व एकाच बाजूला असतो," गंभीरने ट्विटमध्ये म्हटले. पाहा यूजरच्या प्रश्नावर गंभीरची प्रतिक्रिया:
दुसरीकडे, गंभीरचे हे उत्तर पाहून अन्य ट्विटर यूजर्स देखील खुश झाले आणि माजी क्रिकेटपटूच्या उत्तराचे समर्थन केले.
अगदी खरे
तल्लख उत्तर
भारतीय ऐक्य
अत्यंत "गंभीर"
सर्वात लोकप्रिय फलंदाज म्हणून ओळखल्या जाणार्या गंभीरने भारतीय क्रिकेट संघासाठी आंतरराष्ट्रीय सर्किटमध्ये उत्कृष्ट कारकीर्द नोंदवली आहे. महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वात भारताने जिंकलेल्या2007 आणि 2011 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये शानदार खेळीमुळे गंभीरची आठवण केली जाते. निवृत्त क्रिकेटपटू तब्बल 58 कसोटी सामने खेळले आणि 4154 धावा केल्या. व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये गंभीरने 147 वनडे आणि 37 टी-20 सामने खेळले ज्यात त्याने अनुक्रमे 5,238 आणि 932 धावा केल्या.