वेस्ट इंडीजने जिंकला CMJ Spirit of Cricket पुरस्कार, COVID-19 काळात 'या' कामगिरीसाठी MCCने केला सन्मान
जून महिन्यात बायोसेक्युर वातावरणात खेळल्या जाणार्या मालिकेसाठी विंडीजचा पुरुष संघ इंग्लंडमध्ये दाखल झाला होता.
MCC 'Spirit of Cricket' Award: कोविड-19 काळात पुरुष आणि महिला संघाना इंग्लंड दौर्यावर पाठवल्याबद्दल वेस्ट इंडीजने (West Indies) यावर्षीचा स्पिरिट ऑफ क्रिकेट पुरस्कार (Spirit of Cricket) जिंकला आहे, मेरीलेबोन क्रिकेट क्लबने (Marylebone Cricket Club) जाहीर केले. मार्च महिन्यात कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ब्रेक लागल्यानंतर जून महिन्यात बायोसेक्युर वातावरणात खेळल्या जाणार्या मालिकेसाठी विंडीजचा पुरुष संघ (West Indies Team) इंग्लंडमध्ये (England) दाखल झाला होता. इंग्लंडने तीन सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली परंतु जेसन होल्डरच्या संघाने मॅन्चेस्टर आणि साऊथॅम्प्टनमध्ये जैव-सुरक्षित बबलमध्ये राहण्याची तयारी दर्शवली नसता मालिका पुढे सरकली नसती. इंग्लंड-वेस्ट इंडिज मालिकेसह आंतराष्ट्रीय क्रिकेटला पुन्हा सुरुवात झाली जे कोरोनाच्या जगभरात होणाऱ्या प्रादुर्भावामुळे थांबवण्यात आले होते. दुसरीकडे, भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ महामारीमुळे दौरा करण्यास अपयशी ठरल्यावर सप्टेंबर महिन्यात इंग्लंड आणि वेस्ट इंडिज महिला संघात टी-20 खेळली गेली.
“ज्या वर्षी क्रिकेटने आम्हाला खूप समाधान दिले आहे, त्यावेळेस क्रिकेट वेस्ट इंडीज आणि त्यांच्या पुरुष आणि महिलांच्या संघांनी इंग्लंड दौऱ्याच्या निर्णयाच्या धैर्याने ओळखले जावे, ही खरोखरच क्रिकेटची भावना दर्शविणारी कार्यपद्धती आहे, हे पूर्णपणे योग्य आहे,” एमसीसी अध्यक्ष कुमार संगकारा म्हणाले. क्रिकेटच्या कायद्याचे संरक्षक आणि लवाद म्हणून काम करणाऱ्या एमसीसीने पाकिस्तान, आयर्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या मंडळांचेही कौतुक केले की त्यांनी त्यांच्या संघांना इंग्लंडमध्ये खेळण्याची परवानगी दिली. एमसीसी आणि बीबीसीने दिवंगत माजी अध्यक्ष आणि बीबीसी कसोटी सामन्याचे विशेष भाष्यकार क्रिस्टोफर मार्टिन-जेनकिन्स यांच्या स्मरणार्थ 2013 मध्ये सीएमजे स्पिरिट ऑफ क्रिकेट पुरस्कार देण्याची सुरुवात झाली.
दरम्यान, ऑक्टोबरमध्ये जेसन होल्डरच्या वेस्ट इंडीज संघाने क्रिकेट रायटर्स क्लब कडून असाच पुरस्कार जिंकला होता. शिवाय, न्यूझीलंड क्रिकेट टीमने मागील वर्षी वर्ल्ड कप फायनलमध्ये दाखवलेल्या खेळ भावनेसाठी पुरस्कार देण्यात आला होता.