WI vs AUS 1st Test 2025 Dream11 Team Prediction: वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला कसोटी सामना; सर्वोत्तम ड्रीम 11 कशी निवडाल? जाणून घ्या

ट्रॅव्हिस हेड ला वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिली कसोटी 2025 सामना ड्रीम 11 संघाचा कर्णधार बनवता येईल. तर फॉर्ममध्ये असलेल्या शाई होप (WI) ला उपकर्णधार म्हणून निवडता येईल.

WI vs AUS 1st Test 2025 Dream11 Team Prediction: वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला कसोटी सामना; सर्वोत्तम ड्रीम 11 कशी निवडाल? जाणून घ्या
AUS vs WI (Photo Credit- X)

West Indies National Cricket Team vs Australia National Cricket Team: वेस्ट इंडिज क्रिकेट संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ (WI vs AUS) यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) 2025-27 चा पहिला कसोटी सामना 25 जून (मंगळवार) पासून बार्बाडोस (Bridgetown) येथील केन्सिंग्टन ओव्हल मैदानावर खेळला जाईल. हा सामना दोन्ही संघांसाठी एका नवीन कसोटी चक्राची सुरुवात आहे. हा सामना वेस्ट इंडिजसाठी खूप खास असेल कारण दीर्घकाळ कसोटी कर्णधार असलेल्या क्रेग ब्रेथवेटनंतर आता रोस्टन चेसकडे संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. वेस्ट इंडिज संघ अलिकडच्या काळात कसोटी क्रिकेटमध्ये संघर्ष करत आहे आणि 2023 मध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या विजयानंतर त्यांनी एकही मालिका जिंकलेली नाही. नवीन कर्णधारपद आणि घरच्या मैदानावर उत्साह असल्याने, कॅरिबियन संघ नवीन सुरुवात करण्याच्या शोधात असेल.

दुसरीकडे, ऑस्ट्रेलियन संघ सध्या कसोटी क्रिकेटमध्ये नंबर-1 क्रमांकाचा संघ आहे. त्यांनी अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभव पत्करला असला तरी, पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील संघाने सलग तीन कसोटी मालिका जिंकल्या आहेत. ऑस्ट्रेलियाला या मालिकेत वर्चस्व गाजवायचे आहे आणि पुन्हा एकदा कसोटी क्रिकेटमध्ये आपले वर्चस्व सिद्ध करायचे आहे.

वेस्ट इंडीज विरुद्ध ऑस्ट्रेलिया संभाव्य प्लेइंग इलेव्हन:

वेस्ट इंडीज राष्ट्रीय क्रिकेट संघ: क्रेग ब्रेथवेट, मायकेल लुईस, शाई होप (विकेटकीपर), केसी कार्टी, जॉन कॅम्पबेल, जस्टिन ग्रीव्हज, रोस्टन चेस (कर्णधार), अल्झारी जोसेफ, जोमेल वॉरिकन, शमार जोसेफ, जेडेन सील्स

ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ: सॅम कॉन्स्टा, उस्मान ख्वाजा, कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, अॅलेक्स केरी (विकेटकीपर), ब्यू वेबस्टर, पॅट कमिन्स (कर्णधार), नॅथन लायन, मिशेल स्टार्क, जोश हेझलवुड

वेस्ट इंडीज विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिली कसोटी 2025 ड्रीम 11 संघ अंदाज: विकेटकीपर- जोश इंग्लिस (ऑस्ट्रेलिया), शाई होप (विकेटकीपर) वेस्ट इंडीज विरुद्ध ऑस्ट्रेलिया फॅन्टसी संघासाठी निवडले जाऊ शकते.

वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिली कसोटी 2025 ड्रीम 11 संघ अंदाज: फलंदाज- ट्रॅव्हिस हेड), क्रेग ब्रेथवेट यांना निवडले जाऊ शकते.

वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिली कसोटी 2025 ड्रीम 11 संघ अंदाज: अष्टपैलू खेळाडू- ब्यू वेबस्टर, रोस्टन चेस, जस्टिन ग्रीव्हज यांना निवडले जाऊ शकते.

इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिली कसोटी 2025 ड्रीम 11 संघ अंदाज: गोलंदाज- जेडेन सील्स, जोश हेझलवुड, मिशेल स्टार्क, पॅट कमिन्स यांना निवडले जाऊ शकते.

वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिली कसोटी 2025 ड्रीम 11 संघ अंदाज: जोश इंगलिस, शाई होप, ट्रॅव्हिस हेड, क्रेग ब्रेथवेट, ब्यू वेबस्टर, रोस्टन चेस, जस्टिन ग्रीव्हज, जेडेन सील्स, जोश हेझलवूड, मिशेल स्टार्क, पॅट कमिन्स

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).