Virat Kohli याला मिळाला मोठा सन्मान, बनला Wisden Almanack च्या 2010 दशकातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटर; सचिन तेंडुलकर-कपिल देव यांनाही पुरस्कार जाहीर
विराट कोहली (Photo Credit: PTI)

Wisden Almanack ODI Cricketer of Decade: 2021 विस्डन (Wisden) क्रिकेटरच्या पंचांग स्पर्धेतील भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याला 2010 च्या दशकातील एकदिवसीय क्रिकेटपटू म्हणून गौरविण्यात आले आहे. कोहली 1971 ते2021 या काळात प्रत्येक दशकात नामांकित पाच क्रिकेटपटूंपैकी एक आहे. दशकाच्या सुरूवातीला 2011 वर्ल्ड कप जिंकणार्‍या भारतीय संघाचा (Indian Team) तो एक सदस्य होता आणि खेळाच्या सर्व स्वरूपात विशेषत: वनडेमध्ये त्याने स्वत:ला अग्रगण्य फलंदाज म्हणून प्रस्थापित केले आहे. 10 वर्षात त्याने 11 हजाराहून अधिक धावा केल्या, ज्याच्या त्याची सरासरी 60 पेक्षा जास्त असून यामध्ये 42 शतकांचा समावेश होता. श्रीलंकेचा फिरकी दिग्गज मुथय्या मुरलीधरन याला 2000 च्या दशकाचा एकदिवसीय क्रिकेटपटू म्हणून निवडण्यात आले. त्याने श्रीलंकेला 2011 वर्ल्ड कपच्या (World Cup) फायनल फेरी गाठण्यास मुख्य भूमिका बजावली असून त्याने दशकात 335 विकेट्स घेतल्या ज्या एका दशकातल्या इतर गोलंदाजांपेक्षा सर्वाधिक आहे. (IPL 2021: आयपीएलच्या 14व्या हंगामात ‘या’ विक्रमांवर विराट कोहलीची नजर, पाहा रनमशीन कोणते रेकॉर्ड करू शकतो)

2011 ते 2020 या काळात एकदिवसीय क्रिकेटमधील कामगिरीबद्दल कोहलीला हा पुरस्कार देण्यात आला आहे. यादरम्यान तो 2011 क्रिकेट विश्वचषक आणि 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणार्‍या भारतीय संघाचा सदस्य होता. इतकंच नाही तर मागील दशकात आयसीसीने आयोजित केलेल्या 5 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये कोहलीचा भारतीय संघ सेमीफायनल फेरीपूर्वी बाहेर पडलेला नाही. कपिल देव आणि सचिन तेंडुलकर नंतर विस्डेनचा हा मान मिळवणारा विराट कोहली हा तिसरा भारतीय क्रिकेटपटू आहे. 1980 आणि 1990 च्या दशकातील वनडे क्रिकटर म्हणून माजी दिग्गज अष्टपैलू कपिल देव  आणि मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरची निवड करण्यात आली आहे. सचिनने एकट्या 1998 मध्ये नऊ एकदिवसीय शतके ठोकली होती, ज्या आतापर्यंतच्या एकाच कॅलेंडर वर्षातील इतर कोणत्याही फलंदाजापेक्षा जास्त आहे.

दरम्यान, कपिलने 1980 दशकात सर्वाधिक विकेट्स घेतल्या आणि सर्वोच्च स्ट्राइक-रेटने 1000 पेक्षा जास्त धावा केल्या. त्यांनी वेस्ट इंडीजविरुद्ध 1983 वर्ल्ड कपमध्ये संघाला शानदार विजय मिळवून दिला होता. वेस्ट इंडिजचे माजी दिग्गज फलंदाज विव रिचर्ड्स 1970 दशकासाठी वर्षाचा एकदिवसीय क्रिकेटपटू म्हणून निवडण्यात आले. रिचर्ड्सने फॉर्मेटच्या पहिल्या दशकात वेस्ट इंडीजच्या वर्चस्वाला उत्तेजना दिली होती, ज्यामध्ये त्यांनी 1970 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शतक झळकावत विजेतेपद पटकावले होते.