India vs Australia ICC World Cup 2019: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात कर्जबुडव्या 'विजय मल्ल्या'ची उघड उपस्थिती
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा सामना पाहण्यासाठी आज पोहचलेल्या लाखो भारतीयांसोबतच कुख्यात व्यापारी विजय मल्ल्या हा देखील इंगलंडच्या द ओव्हल स्टेडियम मध्ये पोहचला आहे.
आईसीसी विश्वचषक (ICC world Cup 2019) सामन्यात आज, भारत (India) विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा (Australia) सामना इंग्लंड (England) येथील द ओव्हल स्टेडियम (The Oval Stadium) मध्ये सुरु आहे. या सामन्यात लाखो भारतीय क्रिकेट रसिक आपल्या टीमला प्रोत्साहन देण्यासाठी पोहचले आहेत. यामध्ये विशेष म्हणजे कुख्यात भारतीय दारू व्यापारी विजय मल्ल्या (Vijay Mallya) हा देखील आजच्या सामन्यासाठी उपस्थित आहे. मल्ल्याने यावेळी पत्रकारांशी संवाद साधत आपण कोणत्याही अन्य क्रिकेट चाहतासारखेच आजचा सामना पाहायला आलो आहोत असे सांगितले.
ANI ट्विट
दरम्यान युके मधील वेस्टमिनिस्टर कोर्टाने मल्ल्या याला पुन्हा भारताच्या स्वाधीन करण्याचे आदेश मागील वर्षीच्या डिसेंबर मध्येच दिले होते मात्र मल्ल्याच्या वकिलांनी या निर्णयाला विरोध करत उच्च न्यायालयात अपील केली आहे. मात्र या सगळ्या कायदेशीर कारवाया सुरु असताना विजय मल्ल्या मात्र बिनधास्तपणे मॅचची मजा घेण्यासाठी आलेला आहे.देशातून करोडो रुपयांचा घोटाळा करून फरार झालेला विजय मल्ल्या हा याआधी देखील अनेकदा अशा प्रकारे क्रिकेटचे सामने पाहायला गेलेला आढळला होता, यावरून त्याच्या क्रिकेट प्रेमाचा अंदाज येतो. Live Cricket Streaming of India vs Australia ICC World Cup 2019: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया लाईव्ह सामना आणि स्कोर पहा Star Sports आणि Hotstar Online वर
दुसरीकडे ऑस्ट्रेलिया सारख्या बलाढ्य टीमला टक्कर देण्यासाठी टीम इंडियाने काहीशी सावध खेळी स्वीकारली आहे. भारताचे दोन्ही सलामीचे फलंदाज रोहित शर्मा आणि शिखर धवन हे अतिशय शांतपणे खेळून जास्त वेळ टिकून राहण्याचा प्रयत्न करतील. हा भारताचा विश्वचषक सामन्यातील दुसरासांना असून दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध सामन्यात टीम इंडियाचा दमदार विजय झाला होता.