Vijay Hazare Trophy 2019: दिल्लीच्या संघात रिषभ पंत, नवदीप सैनी यांना स्थान; शिखर धवन 'या' कारणाने आऊट
शिखर धवन याचे नाव सध्या संघात जोडले गेले नाही.
दिल्लीने विजय हजारे ट्रॉफी 2019 साठी 16 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.रिषभ पंत आणि नवदीप सैनी यांनी संघात स्थान देण्यात आले आहेत, तर ध्रुव शोर यांच्याकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. शिखर धवन याचे नाव सध्या संघात जोडले गेले नाही, कारण धवनला वैयक्तिक कारणास्तव ऑस्ट्रेलियाचाला जावे लागणार आहे. पंतदेखील विजय हजारे ट्रॉफीमधील सर्व सामने खेळू शकणार नाही. दिल्लीचा संघ विदर्भ विरुद्ध त्यांच्या मोहिमेची सुरुवात करेल. पंत आणि सैनी, हे दोन्ही खेळाडू सुरुवातीच्या सामन्यांसाठी उपलब्ध असतील अशी शक्यता आहे. (दक्षिण आफ्रिकेच्या 'या' वेगवान गोलंदाजाने एका डावात घेतल्या 9 विकेट्स, टीम इंडियाच्या फलंदाजा बनवलं आपलं पहिला शिकार Video)
दिल्लीचे वरिष्ठ निवड समितीचे अध्यक्ष अतुल वासन म्हणाले की, पंत दिल्लीसाठी किमान दोन ते तीन सामने खेळण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर ते राष्ट्रीय संघात शामिल होईल. त्याला स्वतः खेळायचे आहे असे पंत यांनी स्वत: म्हटले आहे. 2 ऑक्टोबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टेस्ट मॅचसाठी 29 सप्टेंबर रोजी भारतीय संघ विशाखापट्टणम येथे दाखल होईल. सैनीचा टेस्ट संघात समावेश नाही पण, तो राष्ट्रीय वनडे चॅम्पियनशिपमध्ये अधिक सामने खेळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, सलामीवीर धवनने सध्या संघातून बाहेर राहण्याचा निर्णय घेतला आहे.
विजय हजारे ट्रॉफीसाठी आसा आहे दिल्लीचा संघ: ध्रुव शोरे (कॅप्टन), नितीश राणा, रिषभ पंत, हिम्मत सिंह, हितेन दलाल, कुणाल चंदेला, ललित यादव, पवन नेगी, नवदीप सैनी, सुबोध भाटी, कुलवंत खेजरोलिया, मनन शर्मा, कुंवर भिदुरी, विकास टोकस, तेजस बरोका आणि अनुज रावत.