33 Runs in One Over: TNPL क्वॉलिफायरमध्ये युवा खेळाडूची ताबडतोड पारी, 19 व्या षटकांत ठोकल्या 33 धावा (Watch Video)
186 धावांचा पाठलाग करताना नेल्लई रॉयल किंग्जला 2 षटकात म्हणजे 12 चेंडूत 37 धावा हव्या होत्या आणि हृतिक इसवरन आणि अजितेश गुरुस्वामी संघासाठी फलंदाजी करत होते.
तामिळनाडू प्रीमियर लीगच्या क्वालिफायर-2 सामन्यात एक मोठा पराक्रम घडला. या सामन्यात दुसऱ्या डावातील 19व्या षटकात 33 धावा करत संघाला विजयी करण्यात फलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावली. डिंडीगुल ड्रॅगन्स आणि नेल्लई रॉयल किंग्जचे संघ स्पर्धेच्या क्वालिफायर-2 मध्ये आमनेसामने होते. नेल्लई रॉयल किंग्जचे फलंदाज हृतिक इसवरन आणि अजितेश गुरुस्वामी यांनी 19 व्या षटकात संघासाठी चमकदार कामगिरी केली. (हेही वाचा - England Beat Australia: इंग्लंडने तिसर्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा तीन गडी राखून केला पराभव, मालिकेत अजूनही 2-1 ने पिछाडीवर)
दोन्ही फलंदाजांनी मिळून 19व्या षटकात एकूण 33 धावा काढल्या. 186 धावांचा पाठलाग करताना नेल्लई रॉयल किंग्जला 2 षटकात म्हणजे 12 चेंडूत 37 धावा हव्या होत्या आणि हृतिक इसवरन आणि अजितेश गुरुस्वामी संघासाठी फलंदाजी करत होते. विरोधी संघाकडून म्हणजेच डिंडीगुल ड्रॅगन्सकडून 19 वे षटक टाकण्यासाठी आलेल्या जी किशोरच्या पहिल्या चेंडूवर हृतिक इसवरनने शानदार षटकार ठोकला.
पाहा व्हिडिओ -
ईश्वरन षटकार मारूनच थांबला नाही, त्याने तीन चेंडूत तीन षटकार मारून हॅट्ट्रिक पूर्ण केली. त्यानंतर चौथ्या चेंडूवर इसवरनने एक घेतली आणि अजितेश गुरुस्वामी स्ट्राईकपर्यंत पोहोचला. षटकातील पहिल्या चेंडूचा सामना करत गुरुस्वामीने शानदार षटकार ठोकला. पुढचा चेंडू नो बॉल होता आणि त्यावर एक धाव आली. पुन्हा स्ट्राईकवर पोहोचलेल्या हृतिक इसवरनने ओव्हरच्या शेवटच्या आणि फ्री हिट चेंडूवर शानदार षटकार ठोकला.