Duleep Trophy 2024 Live Streaming: उद्यापासून सुरू होणार देशांतर्गत क्रिकेटचा थरार, जाणून घ्या शेड्यूलपासून लाईव्ह स्ट्रीमिंगपर्यंत सर्व काही एका क्लिकवर

ज्यामध्ये ऋषभ पंत, शुभमन गिल, श्रेयस अय्यरसह भारताचे अनेक मोठे स्टार खेळाडू दिसणार आहेत.

Duleep Trophy 2024 (Photo Credit - X)

Duleep Trophy 2024: भारताच्या सर्वोत्तम खेळाडूंनी सजलेली दुलीप ट्रॉफी 5 (Duleep Trophy 2024) सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. ज्यामध्ये ऋषभ पंत, शुभमन गिल, श्रेयस अय्यरसह भारताचे अनेक मोठे स्टार खेळाडू दिसणार आहेत. डिसेंबर 2022 मध्ये रस्ता अपघातात जखमी झाल्यानंतर पहिल्यांदाच लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या पंतवर सर्वांचे लक्ष असेल. डिसेंबर 2022 मध्ये त्याने बांगलादेशविरुद्ध लाल चेंडूचा शेवटचा सामना खेळला होता. तो अभिमन्यू ईश्वरनच्या नेतृत्वाखालील टीम बी साठी मैदानात उतरेल. चार संघांसह ही स्पर्धा बेंगळुरू आणि अनंतपूर या दोन शहरांमध्ये खेळवली जाईल. इंडिया ए चा कर्णधार शुभमन गिल, इंडिया बी चा कर्णधार अभिमन्यू ईश्वरन, इंडिया क चा कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि इंडिया डी चा कर्णधार श्रेयस अय्यर असेल.

पाहा वेळापत्रक

5 - 8 सप्टेंबर टीम अ विरुद्ध टीम बी बेंगळुरू

5 - 8 सप्टेंबर टीम क विरुद्ध टीम डी अनंतपूर

12-15 सप्टेंबर टीम अ विरुद्ध टीम डी अनंतपूर

12-15 सप्टेंबर टीम ब विरुद्ध टीम क अनंतपूर

19 ते 22 सप्टेंबर टीम बी विरुद्ध टीम डी अनंतपूर

19 ते 22 सप्टेंबर टीम अ विरुद्ध टीम क अनंतपूर

कधी अन् कुठे पाहणार सामना?

दुलीप ट्रॉफी 2024 गुरुवार, 5 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. हे सगळे सामने बंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियम आणि अनंतपूर येथील ग्रामीण विकास स्टेडियमवर खेळवले जातील. दुलीप ट्रॉफी 2024 चे सामने पहाटे 9.30 वाजता सुरू होतील. दुलीप ट्रॉफी सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर केले जाईल. दुलीप ट्रॉफी सामन्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमा ॲपवर असेल. (हे देखील वाचा: Duleep Trophy: सूर्यकुमार यादव आणि जडेजासह हे 6 भारतीय खेळाडूंना दुखापत, जाणून घ्या दुलीप ट्रॉफीच्या सर्व 4 संघांचा अपडेटेड संघ)

दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या फेरीसाठी अपडेटेड संघ

भारत अ: शुभमन गिल (कर्णधार), मयंक अग्रवाल, रायन पराग, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), केएल राहुल, तिळक वर्मा, शिवम दुबे, तनुष कोटियन, कुलदीप यादव, आकाश दीप, खलील अहमद, आवेश खान, विद्वत कवेरप्पा, कुमार कुशाग्रा , शास्वत रावत

भारत ब: अभिमन्यू इसवरन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, सरफराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), मुशीर खान, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी, यश दयाल, मुकेश कुमार, राहुल चहर, आर साई किशोर, मोहित अवस्थी, एन जगदीसन (यष्टीरक्षक)

भारत क: ऋतुराज गायकवाड (कर्णधार), साई सुदर्शन, रजत पाटीदार, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), बाबा इंद्रजीत, हृतिक शौकीन, मानव सुथार, गौरव यादव, विशाक विजयकुमार, अंशुल खांबोज, हिमांशू चौहान, मयंक मार्कंडे (आर्यन, मयंक) , संदीप वारियर

भारत ड: श्रेयस अय्यर (कर्णधार), अथर्व तायडे, यश दुबे, देवदत्त पडिक्कल, रिकी भुई, सरांश जैन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आदित्य ठाकरे, हर्षित राणा, तुषार देशपांडे, आकाश सेनगुप्ता, केएस भरत (विकेटकीपर), सौरभ कुमार.