IPL 2025 Mega Auction: आयपीएलचा मेगा लिलाव 24-25 नोव्हेंबरला होण्याची शक्यता, रियाधमध्ये होऊ शकते आयोजन
आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, केएल राहुल, इशान किशन यांच्यासह अनेक बड्या खेळाडूंचा लिलाव होणार आहे. या खेळाडूंना फ्रँचायझी संघांनी सोडले आहे.
IPL 2025 Mega Auction Date & Venue: आयपीएल 2025 साठी मेगा लिलाव (IPL 2025 Mega Auction) 24-25 नोव्हेंबर रोजी आयोजित केला जाऊ शकतो. एएनआयच्या रिपोर्टनुसार, रियाध (सौदी अरेबिया) मध्ये याचे आयोजन केले जाऊ शकते. अलीकडेच आयपीएलच्या सर्व फ्रँचायझी संघांनी कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली होती. आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, केएल राहुल, इशान किशन यांच्यासह अनेक बड्या खेळाडूंचा लिलाव होणार आहे. या खेळाडूंना फ्रँचायझी संघांनी सोडले आहे. संघांनी एकूण 46 खेळाडूंना कायम ठेवले आणि एकूण 558.5 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. सर्व फ्रँचायझींनी राखून ठेवलेल्या एकूण 46 खेळाडूंपैकी 36 खेळाडू भारतीय आहेत, त्यापैकी 10 खेळाडू अनकॅप्ड भारतीय खेळाडू आहेत.
इंग्लंडच्या कोणत्याही खेळाडूला कायम ठेवले नाही
इंग्लंडच्या कोणत्याही खेळाडूला फ्रँचायझीने कायम ठेवले नाही, जॉस बटलर, लियाम लिव्हिंगस्टोन, जॉनी बेअरस्टो, मोईन अली, सॅम करन, हॅरी ब्रूक, फिल सॉल्ट आणि विल जॅक सारख्या अनेक स्टार खेळाडूंना सोडण्यात आले, हे खेळाडू मागील हंगामात संपूर्ण सामना खेळू शकले नाही. (हे देखील वाचा: Rinku Singh New House: टीम इंडियाचा स्टार फलंदाज रिंकू सिंगने खरेदी केले ड्रीम हाउस, खर्च केले करोडो रुपये)
'या' खेळाडूंना ठेवण्यात आले कायम
चेन्नई सुपर किंग्ज: ऋतुराज गायकवाड, मथिशा पाथिराना, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी
दिल्ली कॅपिटल्स: अक्षर पटेल, कुलदीप यादव, ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल
गुजरात टायटन्स: राशिद खान, शुभमन गिल, साई सुदर्शन, राहुल तेवतिया, शाहरुख खान
कोलकाता नाइट रायडर्स: रिंकू सिंग, वरुण चक्रवर्ती, सुनील नरेन, आंद्रे रसेल, हर्षित राणा, रमणदीप सिंग
लखनौ सुपर जायंट्स: निकोलस पूरन, रवी बिश्नोई, मयंक यादव, मोहसीन खान, आयुष बडोनी
मुंबई इंडियन्स: जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रोहित शर्मा, तिलक वर्मा
पंजाब किंग्स: शशांक सिंग, प्रभसिमरन सिंग
राजस्थान रॉयल्स: संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरोन हेटमायर, संदीप शर्मा
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु: विराट कोहली, रजत पाटीदार, यश दयाल
सनरायझर्स हैदराबाद: पॅट कमिन्स, अभिषेक शर्मा, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन, ट्रॅव्हिस हेड