Umesh Yadav याला मिळाली गुड न्यूज, चिमूलकीच्या आगमनाची टीम इंडिया गोलंदाजाने खुशखबर, पहा Post
भारतीय क्रिकेटपटूने ही माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. उमेशने सोशल मीडियावर एका गोंडस बाळाचा फोटो शेअर करत लिहिले की, “माझी चिमुकली राजकुमारी, या जगात तुझं स्वागत आहे. तुझ्या येण्याने मी खूपच आनंदी झालो आहे.”
भारतीय वेगवान गोलंदाज उमेश यादवच्या (Umesh Yadav) घरी चिमूलकीचे आगमन झाले आहे. भारतीय क्रिकेटपटूने ही माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. उमेशने सोशल मीडियावर एका गोंडस बाळाचा फोटो शेअर करत लिहिले की, “माझी चिमुकली राजकुमारी, या जगात तुझं स्वागत आहे. तुझ्या येण्याने मी खूपच आनंदी झालो आहे.” ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) मेलबर्नमधील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दरम्यान उमेशच्या मांडीला दुखापत झाली ज्यामुळे त्याला उर्वरित दोन टेस्ट मॅचमधून माघार घाव्यावी लागली आहे. दुखापत होऊन मायदेशी परतणाऱ्या उमेशला या बातमीने सुखद धक्का दिला आहे. मेलबर्न कसोटीच्या दुसर्या डावात स्नायूंनां ताण आल्याच्या तक्रारीनंतर उमेश मैदानाबाहेर गेला होता. ऑस्ट्रेलियाच्या दुसर्या डावात तो केवळ 3.3 षटकात गोलंदाजी करू शकला, ज्यानंतर त्याला स्नायूंवर ताण आल्यामुळे मैदान सोडावे लागलं होतं. ज्यानंतर बीसीसीआयने (BCCI) ट्विटवर उमेशला माघार घ्यावी लागली असण्याची पुष्टी केली. (IND vs AUS Test 2021: भारतीय कसोटी संघात उमेश यादवच्या जागी टी नटराजनला संधी, शार्दूल ठाकूरचाही समावेश)
दरम्यान, उमेश यादवच्या जागी ऑस्ट्रेलियाविरुद्ध उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी टी नटराजनचा संघात समावेश करण्यात आला आहे. घरी चिमुकलीच्या आगमनाच्या बीसीसीआयने गोलंदाजाला शुभेच्छा दिल्या. "उमेश यादवला आज कन्यारत्नप्राप्त झाल्याबद्दल अभिनंदन. आम्ही त्याला लवकरच स्वस्थ होण्याची आणि त्याला मैदानावर परत येण्याची आशा करतो."
लक्षात घेण्यासारखे म्हणजे, भारताचा कर्णधार विराट कोहली पितृत्व रजा घेण्याचा निर्णय घेतला आहे. जानेवारी महिन्यात अनुष्का शर्माच्या बाळंतपणासाठी भारताचा कर्णधार कोहली मायदेशी परतला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळल्यानंतर कोहली भारतात परतला. कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व करीत आहेत. पहिला कसोटी सामना गमावल्यानंतर भारतीय संघाने दुसर्या कसोटीत शानदार प्रदर्शन केले आणि ऑस्ट्रेलियाला 8 विकेटने पराभूत केले. भारताचा कार्यवाहक कर्णधार रहाणेने मेलबर्न कसोटीच्या पहिल्या डावात शानदार 112 धावा केल्या.