India Beat Bangladesh, 3rd T20I Match Scorecard: टीम इंडियाने 'विजयादशमी'च्या दिवशी देशाला दिली विजयाची भेट, तिसऱ्या टी-20 मध्ये बांगलादेशचा 133 धावांनी केला पराभव

तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताने बांगलादेशवर 133 धावांनी विजय मिळवला. विजयादशमीच्या मुहूर्तावर टीम इंडियाने देशवासीयांना विजयाची मोठी भेट दिली आहे. यासह टीम इंडियाने तीन सामन्यांची मालिका 3-0 अशी जिंकली आहे.

India Beat Bangladesh, 3rd T20I Match Scorecard: टीम इंडियाने 'विजयादशमी'च्या दिवशी देशाला दिली विजयाची भेट, तिसऱ्या टी-20 मध्ये बांगलादेशचा 133 धावांनी केला पराभव
Team India (Photo Credit - X)

Indian National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team 3rd T20I Match: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ (Indian National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला गेला. तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताने बांगलादेशवर 133 धावांनी विजय मिळवला. विजयादशमीच्या मुहूर्तावर टीम इंडियाने देशवासीयांना विजयाची मोठी भेट दिली आहे. यासह टीम इंडियाने तीन सामन्यांची मालिका 3-0 अशी जिंकली आहे. कसोटीनंतर टीम इंडियाने बांगलादेशला टी-20 मालिकेतही पराभूत केले आहे.

दरम्यान, तिसऱ्या आणि शेवटच्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, तर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही संघाला 23 धावावर पहिला मोठा धक्का बसला. यानंतर संजू सॅमसन आणि सूर्यकुमार यादव यांनी शानदार फलंदाजी करत संघाला 196 धावांपर्यंत नेले. टीम इंडियाने 20 षटकात 6 गडी गमावून 297 धावा केल्या. टीम इंडियासाठी संजू सॅमसनने सर्वाधिक 111 धावांची तुफानी खेळी खेळली. या स्फोटक खेळीदरम्यान संजू सॅमसनने 47 चेंडूत 11 चौकार आणि 8 षटकार ठोकले. संजू सॅमसनशिवाय सूर्यकुमार यादवने 75 धावा केल्या.

हे देखील वाचा: IND vs BAN 3rd T20I: हैदराबादमध्ये भारतीय फलंदाजांनी घातला धुमाकूळ, एकाच सामन्यात केले अनेक टी-20 मोठे विक्रम

दुसरीकडे, बांगलादेशकडून तनझिम हसन शाकिबने सर्वाधिक तीन बळी घेतले. तन्झीम हसन साकिबशिवाय तस्किन अहमद, मुस्तफिझूर रहमान आणि महमुदुल्लाह यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. हा सामना जिंकण्यासाठी बांगलादेश संघाला 20 षटकात 298 धावा करायच्या होत्या.

लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या बांगलादेश संघाची सुरुवात चांगली झाली नाही आणि संघाला शून्यावर पहिला मोठा धक्का बसला. बांगलादेशचा संघ 20 षटकांत 7 गडी गमावून केवळ 164 धावा करू शकला. बांगलादेशकडून तौहीद हृदयॉयने सर्वाधिक नाबाद 63 धावांची खेळी खेळली. तौहीद हृदयॉयशिवाय लिटन दासने 42 धावा केल्या. मयंक यादवने टीम इंडियाला पहिले यश मिळवून दिले. टीम इंडियाकडून रवी बिश्नोईने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. रवी बिश्नोईशिवाय मयंक यादवने दोन विकेट्स घेतल्या.

(The above story first appeared on LatestLY on Oct 12, 2024 10:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).