TATA IPL Mega Auction 2025: आज मेगा लिलावात 'या' 10 विदेशी खेळाडूंना मिळू शकते कोटींची मोठी रक्कम, पाहा यादीत कोणाचा समावेश

लिलावाच्या मैदानात अनेक परदेशी खेळाडू आहेत ज्यांनी गेल्या मोसमात चमकदार कामगिरी केली होती.

IPL 2025 Mega Auction: आयपीएल 2025 साठी (IPL 2025) होणाऱ्या मेगा लिलावासाठी आता थोडाच वेळ शिल्लक आहे. यावेळी सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात मेगा लिलाव होणार आहे. हा मेगा लिलाव 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी होणार आहे, ज्यामध्ये सर्व 10 फ्रँचायझी मोठ्या प्रमाणात बोली लावताना दिसतील. आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात अनेक परदेशी खेळाडूंना करोडोंची मोठी रक्कम मिळू शकते. लिलावाच्या मैदानात अनेक परदेशी खेळाडू आहेत ज्यांनी गेल्या मोसमात चमकदार कामगिरी केली होती. तर आम्ही तुम्हाला अशाच 10 विदेशी खेळाडूंबद्दल सांगणार आहोत, ज्यांना या मेगा लिलावात करोडोंची मोठी रक्कम मिळू शकते.

1. जोस बटलर (Jos Buttler)

आयपीएल 2024 पर्यंत राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलर 2025 च्या मेगा लिलावासाठी रिंगणात आहे. संघ बटलरवर मोठी बोली लावू शकतात.

2. फिल सॉल्ट (Phil Salt)

गेल्या मोसमात कोलकाता नाईट रायडर्सचा भाग असलेला इंग्लंडचा स्टार फलंदाज फिल सॉल्ट यावेळी मेगा लिलावात मैदानात उतरला आहे. सॉल्टची गेल्या मोसमातील कामगिरी लक्षात घेता संघ त्याच्यावर करोडो रुपये खर्च करू शकतात.

3. मिचेल स्टार्क (Mitchell Starc)

ऑस्ट्रेलियाचा स्टार वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आयपीएल 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना दिसला होता. यावेळी स्टार्क मेगा लिलावासाठी मैदानात उतरला असून गेल्या वेळेप्रमाणे या वेळीही त्याला मोठी रक्कम मिळू शकते. गेल्या मोसमात स्टार्कला केकेआरने 24.75 कोटींना विकत घेतले होते.

4. कागिसो रबाडा (Kagiso Rabada)

दक्षिण आफ्रिकेचा स्टार वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाही लिलावाच्या मैदानात उतरला आहे. रबाडावरही सर्व संघांची नजर असेल. (हे देखील वाचा: TATA IPL Mega Auction 2025: आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात 'या' खेळाडूंवर असतील सर्वांच्या नजरा, 20 कोटी रुपयांपर्यंत लागू शकते बोली)

5. हॅरी ब्रूक (Harry Brook)

यावेळच्या आयपीएल लिलावासाठी इंग्लंडचा स्टार फलंदाज हॅरी ब्रूकही रिंगणात आहे. संघ ब्रूकवर चांगली बोली लावू शकतात.

6. जॅक फ्रेझर मॅकगुर्क (Jack Fraser McGuirk)

ऑस्ट्रेलियाचा युवा फलंदाज जॅक फ्रेझर मॅकगर्कने आयपीएल 2024 मध्ये चमकदार कामगिरी केली होती. अशा स्थितीत मॅकगर्कला मेगा लिलावात कोट्यवधी रुपयांची किंमत सहज मिळू शकते.

7. मार्कस स्टॉइनिस (Marcus Stoinis)

ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू मार्कस स्टॉइनिस पॉवर हिटिंगसाठी ओळखला जातो. अशा स्थितीत संघ स्टॉइनिसवर मोठी बोली लावू शकतात.

8. विल जॅक (Will Jack)

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू विल जॅक आयपीएल 2024 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून खेळताना दिसला होता. जॅकने चमकदार कामगिरी केली होती. मात्र, तरीही आरसीबीने त्याला सोडून दिले. आता मेगा लिलावात विल जॅकवर मोठी बोली लावली जाऊ शकते.

9. सॅम कुरन (Sam Curran)

संघांना इंग्लंडचा वेगवान गोलंदाज अष्टपैलू सॅम कुरनचाही समावेश करायला आवडेल. करनला मेगा लिलावात मोठी रक्कम मिळू शकते.

10. जोफ्रा आर्चर (Jofra Archer)

आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात इंग्लंडचा स्टार वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरलाही चांगली किंमत मिळू शकते.