Abu Dhabi T10 League: अबू धाबी टी10 क्रिकेट स्पर्धेतील आठ सहभागी संघ जाणून घ्या, 'या' भारतीय क्रिकेटपटुंचाही आहे समावेश

क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा टी 10 लीगची भेट मिळणार आहे. टी 10 लीगचा तिसरा हंगाम 14 नोव्हेंबरपासून युएईच्या शेख झायेद क्रिकेट स्टेडियमवर सुरू होणार आहे. सिंधिस, बंगाल टायगर्स आणि पख्तून यांच्या जागी अनुक्रमे नवीन तयार झालेलय डेक्कन ग्लेडिएटर्स, दिल्ली बुल्स आणि बांग्ला टायगर्स संघाचा समावेश करण्यात आला आहे.

युवराज सिंह, इयन मॉर्गन आणि आंद्रे रसेल (Photo Credits : Getty Images)

क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा टी 10 लीगची भेट मिळणार आहे. टी 10 लीगचा तिसरा हंगाम 14 नोव्हेंबरपासून युएईच्या (UAE) शेख झायेद क्रिकेट स्टेडियमवर (Sheikh Zayed Stadium) सुरू होणार आहे. या लीगची सुरुवात 2017 मध्ये झाली होती. लीगचा तिसरा हंगाम भव्य होण्यासाठी तयारी पूर्ण झाली आहे. यावेळी या लीगमध्ये क्रिकेट विश्वातील माजी आणि सध्याचे खेळाडूंचा समावेश असेल. यावेळी लीगमध्ये दोन नवीन फ्रॅन्चायझीही सामील झाल्या आहेत. त्यापैकी पाकिस्तानचे कलंदर आणि बांग्लादेशचे बांग्ला टायगर्स आहेत. चाहत्यांपर्यंत पोहचण्यासाठी अजून बरीच व्यवस्था केली जात आहे. अबूधाबी टी-10 लीगचे अध्यक्ष शाहू-उल मुल्क यांनी आशा व्यक्त केली आहे की 2018 साली लीगला मिलेल्या यशानंतर यंदा लीग मैलाचा टप्पा गाठेल. यावर्षीच्या खेळाडूंच्या ड्राफ्टमध्ये आठ संघांमधून 100 हून अधिक खेळाडूंचा समावेश करण्यात आला होता.

नॉर्दन वॉरियर्स (Northern Warriors) संघ मागील वर्षी चॅम्पियन बनला होता. यंदाचे विश्वचषक जिंकणार्‍या इयान मॉर्गन याच्या हाती दिल्ली बुल्स (Delhi Bulls) संघाची कमान देण्यात आली आहे. त्याच्या व्यतिरिक्त पाकिस्तानचा अनुभवी फलंदाज शोएब मलिक आणि अफगाणिस्तानचा खेळाडू मोहम्मद नबी (Mohammad Nabi) सारख्या दिग्गज खेळाडूंचा संघात समावेश आहे. सिंधिस, बंगाल टायगर्स आणि पख्तून यांच्या जागी अनुक्रमे नवीन तयार झालेलय डेक्कन ग्लेडिएटर्स, दिल्ली बुल्स आणि बांग्ला टायगर्स संघाचा समावेश करण्यात आला आहे. कलंदर नामक आणखी एक नवीन संघ सामील झाला असून त्याचे नेतृत्व पाकिस्तानचा महान शाहिद आफ्रिदी करणार आहे. खेळाडूंसह संघाची संघ यादी खालील प्रमाणे आहे. क्रिकेटच्या या स्वरुपात दहा षटकांचे सामने असतील आणि एक सामना 90 मिनिटांत संपेल.

टीम डेक्कन ग्लॅडिएटर्स: शेन वॉटसन (आयकॉन प्लेअर आणि कॅप्टन), बेन कटिंग, केरॉन पोलार्ड, अँटोन डेविच, झहीर खान, मोहम्मद शहजाद, फवाद अहमद, शेल्डन कोटरेल, मिगेल प्रेटोरियस, डॅन लॉरेन्स, भानुका राजपक्षे, मेसन क्रेन, इम्तियाज अहमद,झहूर खान, आसिफ खान आणि शरीफ असदुल्ला.

टीम नॉर्थन वॉरियर्स: डॅरेन सॅमी (आयकॉन प्लेअर आणि कॅप्टन), आंद्रे रसेल, क्रिस ग्रीन, सॅम बिलिंग्ज, प्रवीण तांबे, लेंडल सिमन्स, रायड एमरिट, सिकंदर रझा, अंश टंडन,अमीर हयात, असेला गुणरत्ने, मार्क दयाल, जॉर्ज मुन्से, नुवान प्रदीप आणि निकोलस पूरन.

टीम मराठा अरेबियन्स: युवराज सिंह (आयकॉन प्लेअर आणि कॅप्टन), क्रिस लिन, ड्वेन ब्राव्हो,लसिथ मलिंगा, हजरतुल्ला झझाई, मिशेल मॅकक्लेनाघन, दासुन शनाका, जेम्स फुलर, चाडविक वॉल्टन, अ‍ॅडम लीथ, वनिंदू हसरंगा, मोहम्मद कासिम, शिराझ अहमद, नजीर अझीझ आणि उमर झीशान लोह्या.

टीम कलंदर: शाहिद आफ्रिदी (आयकॉन प्लेअर आणि कॅप्टन), लूक रोंकी, सोहेल अख्तर, लॉरी इव्हान्स, समित पटेल, इमरान नजीर, क्रिस जॉर्डन, टॉम बंटन, जॉर्डन क्लार्क, हॅरिस रऊफ,अहसान मिर्झा, फिल सॉल्ट, माज खान, मजीद अली आणि दिलबर हुसेन.

टीम अबू धाबी: मोईन अली(आयकॉन प्लेअर आणि कॅप्टन), ल्यूक राइट, कोरी अँडरसन, पारस खडका, हैरी गुर्नी, लुईस ग्रेगरी, रिचर्ड ग्लेसन, निरोशन डिकवेला, बेन लाफ्लिन, हेडन वॉल्श, अ‍ॅलेक्स डेव्हिस, रोहन मुस्तफा आणि रमीझन शहजाद.

टीम बांगला टायगर्स: थिसारा परेरा (आयकॉन प्लेअर आणि कॅप्टन), कॉलिन इंग्राम, आंद्रे फ्लेचर, रिले रॉसो, लियाम प्लंकेट, कायस अहमद, टॉम मूरस, रॉबी फ्राइलिंक, डेव्हिड विसे, डेव्हिड कोथिथिगोडा, फरहाद रजा, शेहन जयसूर्या, चिराग आणि मोहम्मद अब्दुल हशेम.

टीम कर्नाटक टस्कर्स: हाशिम आमला(आयकॉन प्लेअर आणि कॅप्टन), संदीप लामिछाने, पॅट ब्राऊन,एव्हिन लुईस, केसरीक विल्यम्स, जॉन्सन चार्ल्स, रॉस व्हाइटली,मालिंदा पुष्पकुमारा, शापुर झद्रन, शफीउल्ला शफीक, नॅथन रिम्मिंग्टन, मार्लन सॅम्युएल्स, उपुल थरंगा, असद पठाण, अहमद रझा आणि आसिफ मुमताज.

टीम दिल्ली बुल्स: इयन मॉर्गन (आयकॉन प्लेअर आणि कॅप्टन), झहीर खान, शोएब मलिक, मोहम्मद नबी, रशीद खान, सोहेल तन्वीर, कुसल परेरा,अली खान, पॉल स्टर्लिंग, शेरफेन रदरफोर्ड, दुश्मंथ चमेरा, डेव्हिड विले, अँजेलो मॅथ्यूज, टोबियस व्हिसी, मुहम्मद उस्मान आणि वहीद अहमद.

मॉर्गन आणि आफ्रिदी हे क्रिकेटींग जगातील अन्य सर्वात प्रसिद्ध खेळाडूंसह या स्पर्धेत सहभाग घेत आहेत. या स्पर्धेचा पहिला सामना मराठा अरेबियन्स आणि नॉर्थन वॉरियर्स यांच्यात खेळला जाईल, त्यानंतर डेक्कन ग्लेडीएटर्स विरुद्ध दिल्ली बुल्स.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now