T10 League 2019: KKR संघातून रिलीज केल्यानंतर क्रिस लिन याने टी10 लीगमध्ये खेळला तुफानी डाव, अलेक्स हेल्स याचा रेकॉर्ड मोडत रचला इतिहास

सोमवारी टीम अबू धाबी संघाविरुद्ध लिनने केवळ 30 चेंडूत नाबाद 91 धावांची शानदार खेळी खेळून सर्वांना आर्श्चर्यचकित केले. या खेळीसह लिनने टी 10 लीगच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वाधिक धावसंख्या नोंदविली. लिनने गेल्या मोसमातील अलेक्स हेल्स याच्या नाबाद 87 धावांचा विक्रम मोडला.

क्रिस लिन (Photo Credits: Twitter / T10 League)

आगामी आयपीएल (IPL) 2020 साठी फ्रँचायझींनी रिलीझ आणि रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघासाने त्यांचा स्फोटक फलंदाज क्रिस लिन (Chris Lynn) याला रिलीज केले आहेत. पण, आत लिनने अबू धाबी टी 10 लीगमध्ये तुफानी डाव खेळत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहेत. सोमवारी टीम अबू धाबी (Abu Dhabi) संघाविरुद्ध लिनने केवळ 30 चेंडूत नाबाद 91 धावांची शानदार खेळी खेळून सर्वांना आर्श्चर्यचकित केले. ऑस्ट्रेलिया संघाचा तुफान फलंदाज लिन आजकालच्या अबू धाबी टी10 लीगमधील मराठा अरेबियन्स संघाचा एक भाग आहे. लिनने अबू धाबीविरुद्ध मराठा अरबी संघा (Maratha Arabians) चा कर्णधार म्हणून खेळत केवळ 30 चेंडूंत 91 धावांचा शानदार डाव खेळला. या स्फोटक डावात लिनने 7 षटकार आणि 9 चौकार ठोकले. लिनच्या या खेळीच्या मदतीने मराठा अरेबियन्सने 24 धावांनी शानदार विजय नोंदविला. 15 नोव्हेंबरला आयपीएलच्या सर्व फ्रेंचायजींनी त्यांच्या खेळाडूंची यादी जाहीर केली. कोलकाता नाईट रायडर्सने 11 खेळवुनसह लिनलाही रिलीज केले. फ्रेंचायझीचा हा निर्णय जोरदार धक्कादायक होता कारण आयपीएल 2019 मध्ये लिनने उत्तम कामगिरीही केली होती. (Mzansi Super League: दक्षिण आफ्रिकेच्या 'या' गोलंदाजाने दोन्ही हातांनी आश्चर्यचकित गोलंदाजी करत घेतल्या विकेट्स, पाहा Video)

दरम्यान या खेळीसह लिनने टी 10 लीगच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वाधिक धावसंख्या नोंदविली. लिनने नाबाद 91 धावांची खेळी केल्याने गेल्या मोसमातील अलेक्स हेल्स (Alex Hales) याच्या नाबाद 87 धावांचा विक्रम मोडला. मोईन अली याच्या नेतृत्वात टीम अबू धाबीने टॉस जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, मराठा अरबी फलंदाजांविरूद्ध अबू धाबी संघाची गोलंदाजी अयशस्वी ठरली.

या सामन्यात मराठा अरेबियन्सने निर्धारित 10 ओव्हरमध्ये 2 गडी गमावून 138 धावा केल्या. याच्या प्रत्युत्तरामध्ये अबु धाबीचा संघ 3 गडी गमावून 114 धावा शकला आणि संघाला 14 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. ल्यूक राइट याने 25 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 40 धावा केल्या तर कर्णधार मोईनने 11 चेंडूत 31 धावा केल्या. दोन्ही संघातील हा सामना अबू धाबीमध्ये खेळला गेला.