Syed Mushtaq Ali T20 Trophy: मुंबई संघाचे चार क्रिकेटपटू Covid-19 पॉझिटिव्ह, पहिल्या देशांतर्गत स्पर्धेपूर्वी BCCI साठी डोक्याची घंटा
सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेपूर्वी मुंबईच्या क्रिकेट संघातील एक-दोन नव्हे तर चार खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेतील (SMAT) मुंबई क्रिकेट संघाला कोविड-19 चा जोरदार फटका बसला असून या सर्व खेळाडूंना संघातून माघार घ्यावी लागली आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (Syed Mushtaq Ali Trophy) 2021 स्पर्धेपूर्वी एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेपूर्वी मुंबईच्या क्रिकेट संघातील (Mumbai cricket Team) एक-दोन नव्हे तर चार खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेतील (SMAT) मुंबई क्रिकेट संघाला कोविड-19 चा जोरदार फटका बसला असून या सर्व खेळाडूंना संघातून माघार घ्यावी लागली आहे. सर्फराज खान (Sarfaraz Khan), प्रशांत सोळंकी, शम्स मुलानी (Shams Mulani) आणि साईराज पाटील हे कोविड पॉझिटिव्ह आढळले आणि त्यांना घरी पाठवून सात दिवसांसाठी सेल्फ आयसोलेशनमध्ये ठेवण्यास सांगण्यात आले आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) या चार कोविड-19 बाधित खेळाडूंची बदली खेळाडूंची बदली निश्चित केली असून त्यांची नावे लवकरच जाहीर केली जातील अशीही माहिती मिळाली आहे. अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. (Syed Mushtaq Ali T20 Trophy: आयपीएल ऑरेंज कॅप विजेता करणार महाराष्ट्राचे नेतृत्व, 4 नोव्हेंबरपासून सुरु होणार देशांतर्गत हंगाम; पहा संपूर्ण संघ)
“आम्ही रॅपिड आरटी-पीसीआर (बदली म्हणून नाव असलेल्या खेळाडूंचे) आयोजित करत आहोत आणि त्यांचे अहवाल लवकरच येतील आणि त्यानुसार ते संघात सामील होतील. आम्ही इतर पथकातील सदस्यांची आरटी-पीसीआर चाचणी देखील घेत आहोत,” सूत्राने सांगितले. रहाणेच्या नेतृत्वातील मुंबई संघाला एलिट ग्रुप बी मध्ये स्थान दिले असून 4 नोव्हेंबरपासून गुवाहाटी येथे होणार्या देशांतर्गत टी-20 स्पर्धेचे साखळी सामने खेळणार आहे. मुंबई कर्नाटकविरुद्ध त्यांच्या मोहिमेची सुरुवात करेल. 4 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीपूर्वी एकाच संघातील चार खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे बीसीसीआयलाही मोठा झटका बसणार आहे. स्पर्धेच्या बायो-बबलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी ही एक मोठी बातमी आहे. बीसीसीआयचे मोठे अधिकारी सध्या यूएईमध्ये आहेत. अशा परिस्थितीत बीसीसीआय इथल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी काय पावले उचलते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मुंबई संघ खालीलप्रमाणे आहे
अजिंक्य रहाणे (कॅप्टन), पृथ्वी शॉ (उपकर्णधार), अमन हकीम खान, अथर्व अंकोलेकर, अरमान जाफर, मोहित अवस्थी, तुषार देशपांडे, रॉयस्टन देस, शिवम दुबे, यशस्वी जयस्वाल, सरफराज खान, तनुष कोटियान, धवलकर, धवलकर, लंडन , शम्स मुलाणी, साईराज पाटील, दीपक शेट्टी, प्रशांत सोळंकी, हार्दिक तैमोर आणि आदित्य तरे.