Sushma Swaraj Dies: सुषमा स्वराज यांचे अफगाणिस्तानचा क्रिकेटर राशिद खान याला भारतीय नागरिकता देणारे मजेदार ट्विट व्हायरल
माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आयपीएल 2018 दरम्यान अफगाणिस्तानाचा फिरकीपटू राशिद खानवरील त्यांचे एक ट्विट सध्या व्हायरल झाले आहेत.
माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज (Sushma Swaraj) यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाबद्दल त्याच्या चाहत्यांकडून सोशल मीडियावर शोक व्यक्त केला जात आहे. माजी परराष्ट्रमंत्री म्हणून सुषमा यांचा कार्यकाळात सदैव लोकांच्या मदतीसाठी उपलब्ध असायच्या. ती 24 तास लोकांना मदत करायच्या आणि अनेकदा ट्विटरवर विविध विषयांवर चर्चा सामायिक करत असे. आयपीएल 2018 दरम्यान अफगाणिस्तानाचा फिरकीपटू राशिद खान (Rashid Khan) यांच्यावरील त्यांचे एक ट्विट सध्या व्हायरल झाले आहेत. (माझी एक आवडती राजकारणी! सुषमा स्वराज यांचे निधन; वीरेंद्र सेहवाग आणि अन्य खेळाडूंनी केले भावनिक Tweet)
इंडियन प्रीमियर लीग 2018 च्या दुसर्या क्वालिफायरमध्ये सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाने ईडन गार्डन्स मैदानावर कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्ध अंतिम सामना जिंकला. अफगाणिस्तानचा युवा स्टार बॉलर राशिदने सनरायझर्ससाठी आयपीएल (IPL) 2018 मध्ये शानदार प्रदर्शन करत संघाला फायनलमध्ये पोहोचण्यास मोलाचा वाटा निभावला. यानंतर सोशल मीडियावर चाहते राशिदला भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी सोशल मीडियावर मागणी करू लागले. तेव्हा सुषमा यांनी ट्विटद्वारे चाहत्यांना अतिशय मजेदार पद्धतीने प्रत्युत्तर दिले. सुषमा यांनी लिहिले की, 'राशिद खान यांना भारतीय नागरिकत्व देणारी सर्व ट्वीट मी पाहिली आहेत, पण नागरिकत्व देण्याचा अधिकार गृह मंत्रालयाकडे आहे.'
यानंतर हे प्रकरण तिथेच संपले नाही. आपल्या देशाच्या खेळाडूंच्या वाढत्या मागणीवर अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ गनी यांनी आपण त्याला कोणालाही देणार नाही असे स्पष्ट केले. त्यांनी ट्विटद्वारे राशिदचे कौतुक केले आणि लिहिले की ते अफगाणिस्तानासाठी तो अत्यंत खास आहेत आणि कोणत्याही किंमतवर त्याला कुठेही जाऊ देणार नाही. दिवंगत सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर त्यांचे राशिदबद्दलचे त्यांचे हे जुने ट्विट खूप व्हायरल होत आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)