Sunrisers Hyderabad Captain: IPL स्पर्धेपूर्वी सनरायझर्स हैदराबादचा संघात मोठा बदल, या खेळाडूवर सोपवली कर्णधारपदाची जबाबदारी

ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि वनडे वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या पॅट कमिन्सवर सलरायझर्स हैदराबादने मोठी जबाबदारी सोपवली आहे.

Pat Cummins (Photo Credit - Twitter)

आयपीएल 2024 या स्पर्धेला येत्या 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेपूर्वी सनरायझर्स हैदराबादने संघात मोठा बदल केला आहे. गेल्या हंगामात सनरायझर्स हैदराबाद संघाचं नेतृत्व करणाऱ्या एडन मार्करमला कर्णधारपदावरुन काढून टाकण्यात आलं आहे. तर त्याच्याऐवजी ही जबाबदारी वर्ल्डकपविजेता कर्णधार पॅट कमिन्सवर सोपवण्यात आली आहे. आयपीएल 2024 स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात पॅट कमिन्सला 20.50 कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिलं होतं. यानंतर त्याच्यावर संघात मोठी जबाबदारी टाकली जाणार हे स्पष्ट झाले होते. (हेही वाचा - IPL 2024 Schedule: क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! आयपीएल 2024 चे वेळापत्रक जाहीर; 22 मार्चला होणार पहिला सामना)

ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि वनडे वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या पॅट कमिन्सवर सलरायझर्स हैदराबादने मोठी जबाबदारी सोपवली आहे.  सनरायझर्स हैदराबाद संघाने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही घोषणा केली आहे. त्यांनी पॅट कमिन्सचा फोटो शेअर करत,'आमचा नवा कर्णधार पॅट कमिन्स..' असं कॅप्शन लिहिलं आहे. आयपीएल स्पर्धेत तो सनरायझर्स हैदराबादलाही चॅम्पियन बनवणार असा विश्वास क्रिकेट फॅन्सने व्यक्त केला आहे.

पाहा पोस्ट -

ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकून देणारा कमिन्स हैदराबादला आयपीएलची ट्रॉफी जिंकून देणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif