पाकिस्तान दौऱ्याआधी श्रीलंका संघाला मोठा झटका; ICC कडून अकीला धनंजय विरुद्ध बंदीची कारवाई, 'हे' आहे कारण
श्रीलंकेच्या संघातील स्टार स्पिनर अकिला धनंजय याला आयसीसीने एक वर्षासाठी गोलंदाजी करण्यास बंदी घातली आहे. आयसीसीकडून माहिती देताना असे सांगितले गेले की अकिलाची गोलंदाजी ऍक्शन संशयास्पद आढळून आले आहे ज्यानंतर त्याच्यावर बंदी घातली गेली आहे.
श्रीलंका (Sri Lanka) क्रिकेट संघाच्या पाकिस्तान (Pakistan) दौऱ्याआधी, मोठी बातमी समोर आली आहे. श्रीलंकेच्या संघातील स्टार स्पिनर अकीला धनंजय (Akila Dananjaya) याला आयसीसीने एक वर्षासाठी गोलंदाजी करण्यास बंदी घातली आहे. आयसीसी (ICC) कडून माहिती देताना असे सांगितले गेले की अकिलाची गोलंदाजी ऍक्शन संशयास्पद आढळून आले आहे ज्यानंतर त्याच्यावर बंदी घातली गेली आहे. न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध 14 ते 18 ऑगस्ट दरम्यान गाल येथे खेळल्या गेलेल्या मॅचदरम्यानअकीलची गोलंदाजीची क्रिया संशयास्पद असल्याचे दिसून आले. आयसीसीने सोशल मीडियावर अकिलच्या 1 वर्षाच्या बंदीची माहिती दिली आहे. पुढील एक वर्षात त्याला त्याच्या गोलंदाजीवर काम करावे लागेल. शिवाय, आयसीसीकडून गोलंदाजीत सुधारणा करण्यास मदत केली जाईल. (PAK vs SL 2019: 9 वर्षानंतर पाकिस्तानात जाणार श्रीलंका संघ, संरक्षण मंत्रालयाने दिला ग्रीन सिग्नल)
बीडीक्रिकटाइमच्या वृत्तानुसार, 25 वर्षीय अकिलाला आयसीसीच्या खर्चापोटी चेन्नईतील रामचंद्र संस्थेत बायो-मेकॅनिकल मूल्यांकन करण्यासाठी पाठविण्यात आले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, धनंजयची गोलंदाजी 4 ते17 डिग्री दरम्यान आहे आणि त्याचे दोन चेंडू 15 डिग्रीपेक्षा जास्त वर फेकले गेले. 2 वर्षातील ही दुसरी वेळ आहे जेव्हा अकिलाला गोलंदाजीसाठी बंदीचा सामना करावा लागला आहे. डिसेंबर 2018 मध्ये त्याच्यवर बंदी घालण्यात आली होती. यापूर्वी 2018 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यादरम्यान त्याची गोलंदाजीची कारवाई संशयास्पद असल्याचे दिसून आले होते.
सध्याच्या बंदीनुसार तो 29 ऑगस्ट 2020 पर्यंत गोलंदाजी करू शकणार नाही. धनंजय हा अष्टपैलू खेळाडू आहे, परंतु तो केवळ फलंदाजीच्या जोरावर संघात स्थान मिळवू शकत नाही आणि अशा परिस्थितीत तो वर्षभरासाठी संघातून बाहेर राहील.अशा परिस्थितीत जेव्हा श्रीलंकेचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये आपली मोहीम जारी ठेवेल तेव्हा अकिलाच्या अनुपस्थितीमुळे मोठा फटका बसण्याची खात्री आहे. वनडे मॅचमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यासह सहा भारतीय खेळाडूंना बाद करून अकिलाचे नाव चर्चेत आले होते.