SL vs NZ 2nd Test 2024 Day 3: श्रीलंकेच्या फिरकीपुढे न्यूझीलंडचा दुसरा डावही गडगडला; चहापानापर्यंत किवींच्या 5 बाद 129 धावा
या सामन्यात लंकेच्या तीन खेळाडूंनी शतके ठोकले. या तीन शतकांच्या जोरावर लंकेने पहिल्या डावात 5 बाद 602 धावा केल्या आहेत.
Sri Lanka National Cricket Team vs New Zealand National Cricket Team: श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दुसरा कसोटी सामन्याला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. दोन्ही संघांमधील हा सामना गॅले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे. आज सामन्याचा तिसरा दिवस आहे. श्रीलंकेने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान, शनिवारी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा पहिला डाव हा 88 धावांवर आटोपला. श्रीलंकेचा डावखुरा फिरकी गोलंदाज प्रभात जयसूर्याने 6 बळी घेतले होते यानंतर श्रीलंकेने न्यूझीलंडला फॉलोऑन दिला आणि पुन्हा त्यांना फलंदाजीसाठी आमंत्रण दिले. श्रीलंकेने न्यूझीलंड क्रिजवर टीकू दिले नाही. तिसऱ्या दिवशी चहापानापर्यंत न्यूझीलंडचा डाव हा 5 बाद 129 धावा पर्यंत पोहचला आहे. (हेही वाचा - Sri Lanka vs New Zeland 2nd Test Day 3 Live Score Update: प्रभात जयसूर्याच्या फिरकीसमोर न्यूझीलंडचे लोटांगण, अवघ्या 88 धावांवर संपूर्ण संघ तंबूत; श्रीलंकाने घेतली 514 धावांची आघाडी)
पाहा पोस्ट -
दरम्यान या सामन्यात लंकन फलंदाजांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांची हवा काढली. या सामन्यात लंकेच्या तीन खेळाडूंनी शतके ठोकले. या तीन शतकांच्या जोरावर लंकेने पहिल्या डावात 5 बाद 602 धावा केल्या आहेत. न्यूझीलंडकडून ग्लिन फिलीप्सने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर श्रीलंकेकडून कमिंडू मेंडिसने सर्वाधिक 182 धावा केल्या आहेत.
सध्या न्यूझीलंडची धावसंख्या ही 5 बाद 199 अशी झाली असून टॉम ब्लून्डेलने आक्रमक 47 धावा केल्या असून ग्लेन फिलीप्स ने नाबाद 32 धावा केल्या आहेत. श्रीलंकेकडून निशान पेरिसने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या आहेत.