Sri Lanka vs New Zeland 2nd Test Day 3: न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका दरम्यानच्या दुसऱ्या कसोटीतील तिसऱ्या दिवसाचा खेळ कमी दृश्यमानतेमुळे थांबवला; किवीं अजूनही 315 धावांने पिछाडीवर

न्यूझीलंडने 88 धावांवर 10 विकेट गमावल्या. श्रीलंकेचा डावखुरा फिरकी गोलंदाज प्रभात जयसूर्याने 6 बळी घेतले आहेत. यानंतर लंकेने किवींना फॉलोऑन दिला.

New Zealand and Sri Lanka Players in Action (Photo Credit: X/@BLACKCAPS)

Sri Lanka National Cricket Team vs New Zealand National Cricket Team:  श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दुसरा कसोटी सामन्याला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. दोन्ही संघांमधील हा सामना गॅले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे. आज सामन्याचा तिसरा दिवस आहे. श्रीलंकेने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान, आजचा खेळ हा खराब प्रकाशमानामुळे लवकर थांबवण्यात आला आहे. खेळ थांबवण्यात आला तेव्हा न्यूझीलंडचा दुसरा डाव 5 बाद 199 पर्यंत पोहचला होता. यावेळी टॉम ब्लूंडेल हा 50 चेंडूत 47 धावा केल्या असून त्याच्या या खेळीत 4 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे. तर ग्लिन फिलीप्स 2 षटकारांच्या मदतीने 41 चेंडूत 32 धावा केल्या आहेत.  (हेही वाचा - SL vs NZ 2nd Test 2024 Day 3: श्रीलंकेच्या फिरकीपुढे न्यूझीलंडचा दुसरा डावही गडगडला; चहापानापर्यंत किवींच्या 5 बाद 129 धावा)

श्रीलंकेला 514 धावांची आघाडी मिळाल्यानंतर लंकन गोलंदाजांनी पुन्हा एकदा आपली जादू दाखवत किवींना सुरुवातीपासून धक्के हे देत राहिले.  आजच्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा न्यूझीलंडने 41 षटकांत 5 बाद 199 धावा केल्या असून न्यूझीलंडकडून डेव्हॉन कॉनवेन सर्वाधिक 61 धावांची खेळी केली आहे. तर श्रीलंकेकडून निशान पेरिसने सर्वाधिक 3 बळी घेतले आहेत.

उद्या सामन्याच्या चौथ्या दिवशी लंकन गोलंदाज हा सामना जिंकण्यासाठी किवींना लवकरात लवकर ऑल ऑऊट करण्याचा प्रयत्न करेल तर न्यूझीलंडकडून कोणताही विकेट न गमावण्यासाठी प्रयत्न करेल. सध्या या सामन्यात श्रीलंकेने आघाडी घेतली असून हा सामना ते सहज जिंकतील अशी स्थिती आहे.