Sri Lanka vs New Zealand 2nd ODI 2024: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचे श्रीलंकेसमोर 210 धावांचे आव्हान; मार्क चॅपमनची 76 धावांची शानदार खेळी
न्यूझीलंडन प्रथम फलंदाजी करताना 45.1 षटकांत सर्वबाद 209 धावा करत श्रीलंकेसमोर 210 धावांचे आव्हान ठेवले आहे.
Sri Lanka National Cricket Team vs New Zealand National Cricket Team, 2nd ODI Match 2024: श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना 17 नोव्हेंबर रोजी म्हणजे आज होणार आहे. उभय संघांमधील हा सामना पल्लेकेले येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दुपारी अडीच वाजल्यापासून खेळवला जाईल. पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेच्या संघाने DLS नियमानुसार न्यूझीलंडचा 45 धावांनी पराभव केला. यासह श्रीलंकेने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेत श्रीलंकेची कमान चरित असलंकाच्या हाती आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडचे नेतृत्व मिचेल सँटनर करत आहे. (हेही वाचा - Sri Lanka vs New Zealand 2nd ODI 2024 Live Streaming: दुसऱ्या वनडेत श्रीलंकेला कडवी झुंज देण्यासाठी न्यूझीलंडचा संघ सज्ज, इथे जाणून घ्या भारतात थेट सामन्याचा कधी, कुठे आणि कसा घेणार आनंद)
पाहा पोस्ट -
या सामन्यात नाणेफेक जिंकून श्रीलंकेने न्यूझीलंडला प्रथम फंलजादाजीचे आमंत्रण दिले होते. न्यूझीलंडन प्रथम फलंदाजी करताना 45.1 षटकांत सर्वबाद 209 धावा करत श्रीलंकेसमोर 210 धावांचे आव्हान ठेवले आहे. यावेळी श्रीलंकाच्या गोलंदाजाच्या समोर न्यूझीलंडचा डाव कोसळला फक्त मार्क चॅपमन आणि मिच हे यांना सोडून एकाही फलंदाजाला चांगला खेळ करता आला नाही. मार्क चॅपमनन 81 चेंडूत 3 षटकार आणि 7 चौकाराच्या मदतीने 76 धावा केल्या. तर मिच हे यांनी 62 चेंडूत 4 चौकाराच्या मदतीने 49 धावा करता आल्या. श्रीलंकेकडून जेफ्री वँडरसे आणि महेश तिष्णा यांनी प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या.
दरम्यान पावसामुळ हा सामना उशीराने सुरू झाला होता. पावसामुळे हा सामना 47 षटकांचा ठेवण्यात आला होता.