डोपिंग टेस्टवरून Sports Ministry ने BCCI ला खडसावले, म्हणाले तुम्हाला टेस्ट करवण्याचा अधिकार नाही

बीसीसीआय़ला डोपिंग चाचणीचा अधिकार नाही. त्यांना भारत सरकार किंवा वाडाकडून याबाबाद अधिकारही देण्यात आलेले नाहीत, असे म्हटले आहेत.

बीसीसीआय | (Photo Credits: PTI)

भारतीय क्रिकेटचा उजवा तारा पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याच्यावर डोपिंग टेस्टमध्ये दोषी आढळल्यानंतर बीसीसीआय (BCIC) ने काही महिन्यांसाठी बंदी घालण्यात आली आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी दरम्यान पृथ्वीच्या यूरीनचे सॅम्पल घेण्यात आले होते. नंतर त्यात बंदी असलेल्या पदार्थाचे सेवन केल्याचं आढळून आले. बीसीसीआयने त्यांच्या अँटी डोपिंग प्रोग्रॅम अंतर्गत ही चाचणी केली होती. पण आता पृथ्वीवरील 8 महिन्यांच्या बंदीबाबत सरकारने बीसीसीआयला फटकार लावत पत्र लिहिले आहे. यात सरकारने उत्तेजक द्रव्यांच्या सेवन चाचणीमध्ये असलेल्या त्रुटींबद्दल उल्लेख करण्यात आला आहे. (पृथ्वी शॉ याच्या बंदी विषयी जोफ्रा आर्चर याला होती पर्व सूचना? त्याचे हे जुने ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे)

इंग्लिश वेबसाईट इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, क्रीडा मंत्रालयाने 26 जूनला डोपिंगबाबत बीसीसीआय़ला पत्र लिहलं होतं. बीसीसीआय़ला डोपिंग चाचणीचा अधिकार नाही. त्यांना भारत सरकार किंवा वाडाकडून याबाबाद अधिकारही देण्यात आलेले नाहीत, असे म्हटले आहेत. वाडाच्या नियमानुसार खेळाडूंच्या डोपिंग चाचणीचा अधिकार अधिकृत अँटी डोपिंग संस्थेलाच आहे. वाडाच्या नियमानुसार बीसीसीआयला अँटी डोपिंगचा अधिकार नाही.

मागील काही वर्षांपासून बीसीसीआयला नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी (नाडा) शी जोड़ण्यावरून त्यांचा सरकारसोबत वाद सुरू आहे. बीसीसीआय वगळता देशातील इतर खेळातील खेळाडू नाडा अंतर्गत येतात. याबाबत बीसीसीआयने नाडाच्या प्रक्रियेत अनेक कमतरता असल्याचे म्हटले होते. दुसरीकडे, शॉबद्दल बीसीसीआयने म्हटले की, 16 जुलै 2019 रोजी पृथ्वीने अँटी डोपिंग नियम व्हायलेशन आणि बीसीसीआय़आच्या अँटी डोपिंग नियमचे उल्लंघन केल्याचे आढळून आले. पृथ्वीने या पदार्थाचं सेवन केल्याचं मान्य केलं. पण ते केवळ खोकला थांबावा या उद्देशानेच केल्याचं बीसीसीआयने मान्य केलं. पण त्याच्या बेजबाबदारपणामुळे त्याच्यावर 8 महिन्याची बंदी घालण्यात आली आहे. पृथ्वीवर 16 मार्च ते 15 नोव्हेंबर 2019 पर्यंत बंदी घालण्यात आली आहे.