South Africa vs India, 2nd T20I Match Live Score Update: दुसऱ्या T20 सामन्यात भारताचा डाव संकटात; सुर्यकुमार यादवही स्वस्तात बाद

टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे. दरम्यान, दुसऱ्या T20 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

South Africa vs India, 2nd T20I Match Live Score Update: दुसऱ्या T20 सामन्यात भारताचा डाव संकटात; सुर्यकुमार यादवही स्वस्तात बाद

South Africa National Cricket Team vs Indian National Cricket Team, 2nd T20I Live Toss Update:  दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील चार सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसरा सामना आजपासून म्हणजेच 10 नोव्हेंबरपासून खेळवला जात आहे. उभय संघांमधला पहिला सामना गकेबरहा येथील सेंट जॉर्ज पार्कवर खेळवला जात आहे. पहिल्या T20 सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 61 धावांनी पराभव केला. यासह टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत बांगलादेशचा पराभव करून दक्षिण आफ्रिका संघ या मालिकेत प्रवेश करणार आहे. या मालिकेत दक्षिण आफ्रिकेची कमान एडन मार्करामच्या खांद्यावर आहे. तर टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे. दरम्यान, दुसऱ्या T20 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.  (हेही वाचा  -  South Africa vs India, 2nd T20I Match Live Score Update: भारताला दुसरा धक्का; अभिषेक शर्मा स्वस्तात बाद)

पाहा पोस्ट -

संजू सॅमसन शुन्यावर बाद झाल्यानंतर अभिषेक शर्माही दुसऱ्या षटकांत 4 धावाकरून बाद झाला. यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्माने भारताचा डाव संभाळण्याचा प्रयत्न केला. पण तीसऱ्या षटकात सुर्यादेखील 4 धावांवर बाद झाला. भारताची धावसंख्या ही 5 षटकांत 24 वर 3 बाद अशी आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).