महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! मराठमोळी स्मृती मानधना यंदाची सर्वोत्तम क्रिकेटपटू

स्मृती हिला 2018 हे सरतं वर्ष यशाचा आलेख वाढवणारं ठरलं. या वर्षानं जाता जाता तिच्या पारड्यात भरभरून दान टाकलं. उत्कृष्ट महिला क्रिकेटपटूसोबतच सर्वोत्तम एकदिवसीय खेळाडू म्हणूनही स्मृतीच्या नावाची घोषणा झाली आहे. तसेच, २०१८च्या ICCच्या यंदाच्या टी२० आणि एकदिवसीय संघातही स्मृतीची निवड करण्यात आली आहे.

Smriti Mandhana | (Photo courtesy: Facebook, Twitter, and Sangigrah, edited images)

यंदाच्या वर्षीची (2018) सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू (ICC Women’s Cricketer of the Year) होण्याचा बहुमान मराठी मुलीला मिळाला आहे. स्मृती मानधना (Smriti Mandhana) असे या महिला क्रिकेटपटूचे नाव आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ही निवड केली. या निवडीमुळे स्मृती मानधना ही रॅचेल हेहो-फ्लिंट पुरस्काराची (Rachael Heyhoe-Flint Award) मानकरी ठरली आहे. हा पुरस्कार त्या वर्षातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूसाठी दिला जातो. स्मृती हिला 2018 हे सरतं वर्ष यशाचा आलेख वाढवणारं ठरलं. या वर्षानं जाता जाता तिच्या पारड्यात भरभरून दान टाकलं. उत्कृष्ट महिला क्रिकेटपटूसोबतच सर्वोत्तम एकदिवसीय खेळाडू म्हणूनही स्मृतीच्या नावाची घोषणा झाली आहे. तसेच, २०१८च्या ICCच्या यंदाच्या टी२० आणि एकदिवसीय संघातही स्मृतीची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे 22 वर्षीय स्मृतीसाठी हे वर्ष यशाची कमान चढती ठेवणारेच ठरले.

स्मृती मानधना हिची गौरवपूर्ण कामगिरी

  • एकदीवसीय सामने
  • एकूण सामने -12
  • एकूण धावा - 669 धावा
  • सरासरी वेग - 67
  • टी ट्वेंटी सामने
  • एकूण सामने - 25
  • एकूण धावा - 622
  • सरासरी स्ट्राईक रेट - 130

दरम्यान, स्मृती हिने आयसीसी महिला वर्ल्ड कप टी२० स्पर्धेत तडफदार कामगिरी केली होती. या कामगिरीच्या जोरावर भारतीय महिला संघाने या स्पर्धेच्या थेट उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. या स्पर्धेत तिने एकूण ५ सामने खेळले. त्यात तिने 125.35 चा स्ट्राईकरेट ठेवत 178 धावा ठोकल्या होत्या. या कामगिरीमुळे ती ICC च्या महिला क्रिकेटपटूच्या एकदिवसीय चौथ्या तर, टी२० क्रमवारीत ती 10 व्या स्थानावर आहे. (हेही वाचा,  P.V. Sindhu ठरली World Tour Finals विजेतेपदाची मानकरी)

ICCच्या यंदाच्या टी२० आणि एकदिवसीय संघातही निवड

दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या महिला क्रिकेटमधील ICC एकदिवसीय संघ आणि ICC टी२० संघाची घोषणा झाली. या संघातही स्मृीतीची निवड करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून केली जाणारी ही निवड म्हणजे खेळाडूच्या कामगिरीची पोचपावती असते. महिला क्रिकेट खेळणाऱ्या सर्व संघांमधून सर्वोत्तम ११ खेळाडू या संघासाठी निवडले जाता. त्यामुळे या निवडीसाठी प्रचंड स्पर्धा असते.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now