SL vs NZ 2nd Test 2024: श्रीलंकेचा पहिला डाव 602 वर घोषित; न्यूझीलंडची अडखळत सुरुवात, असीतो फर्नांडोने टॉम लॅथमला केले स्वस्तात बाद

श्रीलंकन गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच किवीसला धक्के दिले. असाथा फर्नांडोने टॉम लेथमला पहिल्याच षटकांत बाद करत न्यूझीलंडला पहिला धक्का दिला.

SL vs NZ (Photo Credit - X)

Sri Lanka National Cricket Team vs New Zealand National Cricket Team 2nd Test 2024 Day 2 Scorecard:   श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दुसरा कसोटी सामना 26 सप्टेंबरपासून गॉल (Galle)  येथील गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात लंकन फलंदाजांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांची हवा काढली. या सामन्यात लंकेच्या तीन खेळाडूंनी शतके ठोकले. . न्यूझीलंडकडून ग्लिन फिलीप्सने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या.  तर श्रीलंकेकडून कमिंडू मेंडिसने सर्वाधिक 182 धावा केल्या आहेत. (हेही वाचा - SL vs NZ 2nd Test 2024: कामिंडू मेंडिसच्या शतकानंतर कुसल मेंडिसचेही शानदार शतक; श्रीलंकेचा पहिला डाव मजबूत स्थितीत, SL - 596/6)

पाहा पोस्ट -

या सामन्यात न्यूझीलंडच्या पहिल्या डावाची सुरुवात अडखळत झाली. श्रीलंकन गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच किवीसला धक्के दिले. असाथा फर्नांडोने टॉम लेथमला पहिल्याच षटकांत बाद करत न्यूझीलंडला पहिला धक्का दिला. यानंतर आठव्या षटकात डेव्हान कॉनवेचा विकेट प्रभात जयसुर्याने मिळवला. सध्या न्यूझीलंडचा डाव 19 वर 2 असा असून केन विल्यमसन आणि अजीज पटेल हे क्रिझवर आहेत.

दरम्यान कामिंदुने पहिल्या दिवशी 56 चेंडूत 51 धावा करत पदार्पणापासून सलग आठव्या डावात 50+ धावा करण्याचा विश्व विक्रम केला. कामिंदुने यासह पाकिस्तानच्या सउद शकील याच्या पदार्पणापासून सलग 7 वेळा 50+ धावा करण्याचा विक्रम मोडीत काढला. त्यानंतर कामिंदुने दुसऱ्या दिवशी तीच लय कायम ठेवली आणि शतक पूर्ण केलं.   कामिंदू मेंडिसने कसोटी क्रिकेटमधील त्याच्या पहिल्या आठ सामन्यांमध्ये प्रत्येक सामन्यात किमान 50 धावा केल्या आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif