KBC 11 मध्ये सर डॉन ब्रॅडमन यांच्यावर विचारलेल्या प्रश्नावर Netizens म्हणाले-याचं उत्तर सचिन तेंडुलकर लाही माहित नसेल
जॅकपॉटसाठी क्रिकेटवर आधारित एक प्रश्न विचारला गेला आणि तो ही सर डोनाल्ड ब्रॅडमन यांच्या विषयी होता. या प्रश्नावर चाहत्यांनी सोशल मीडियावर अनेक क्रिकेट दिग्गजांना टॅग केले असून ते म्हणाले की, सचिन तेंडुलकर यांनादेखील कदाचित या प्रश्नाचे उत्तरही माहित नसेल.
बिहारच्या (Bihar) जहानाबाद जिल्ह्यातील सनोज राज 'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati) हंगाम 11 मध्ये 1 कोटी रुपये जिंकणारा पहिला स्पर्धक आहे. 7 दशलक्ष रुपयांच्या जॅकपॉट प्रश्नाचे जरी त्यांना योग्य उत्तर देता आले नाही, पण एक कोटी रुपये जिंकून संजोज खूश आहे. जॅकपॉटसाठी क्रिकेटवर आधारित एक प्रश्न विचारला गेला आणि तो ही सर डोनाल्ड ब्रॅडमन यांच्या विषयी होता. 'ऑस्ट्रेलियन महान फलंदाज डॉन ब्रॅडमन यांनी कोणत्या भारतीय गोलंदाजाच्या चेंडूवर प्रथम श्रेणी क्रिकेटमधील 100 वे शतक पूर्ण केले?" या जॅकपॉट प्रश्नाचे उत्तर सनोजला देता आले नाही, अखेरीस त्यांना एक कोटींवर समाधान मानावे लागले. बाका जिलानी, कमांडर रंगाचारी, गोकुमल किशनचंद आणि कंवर रायसिंग हे पर्याय होते. ऑप्शन सी, गोकुमल किशनचंद हे योग्य उत्तर होते आणि राज यांना काहीही धोका पत्करण्याची इच्छा नव्हती आणि म्हणूनच त्यांनी 1 कोटी घेत प्रश्न सोडून दिला. (Ashes 2019: इंग्लंडविरुद्ध हेडींगले टेस्टमध्ये मार्नस लाबुशेन याने इतिहास रचला; डॉन ब्रॅडमन, मॅथ्यू हेडन यांच्यासह 'या' यादीत झाला समावेश)
दरम्यान, या प्रश्नावर चाहत्यांनी सोशल मीडियावर अनेक क्रिकेट दिग्गजांना टॅग केले असून ते म्हणाले की, सचिन तेंडुलकर यांनादेखील कदाचित या प्रश्नाचे उत्तरही माहित नसेल. पहा चाहत्यांनी कशी घेतली सचिनची फिरकी:
सचिनलाही त्याचे उत्तर माहित नव्हते
आणि .. डॉन ब्रॅडमन म्हणाले की सचिन तेंडुलकरने त्याला स्वतःच्या फलंदाजीची आठवण करून दिली
भारतीय संघ 1947-48 मध्ये लाला अमरनाथ च्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया दौर्यावर आला होता. या दौर्यावरील कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया इलेव्हनविरुद्ध सराव सामना खेळाला होता. 15 नोव्हेंबर 1947 रोजी सिडनी येथे झालेल्या सामन्यात ब्रॅडमनने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शतक पूर्ण केले. या मॅचमध्ये ब्रॅडमनने 177 चेंडूत 172 धावा केल्या. गोगुमल किशनचंद हे भारताचे कसोटी क्रिकेटपटू होते. त्यांनी भारत, बडोदा, गुजरात, सिंध आणि वेस्टर्न इंडिया संघांच्या वतीने क्रिकेट खेळले आहेत.