IND vs ENG: 'विराटच्या जागी शुभमन गिलला फलंदाजी....'; इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघाला Ravi Shastri यांचा सल्ला

रवी शास्त्रींनी संघात एका फिरकी गोलंदाजासह चार वेगवान गोलंदाजांची निवड करण्याा सल्ला दिला आहे. या सूत्रामुळे गेल्या इंग्लंड दौऱ्यात भारताला यश मिळाले असे त्यांनी सांगितले आहे.

Ravi Shastri (Photo Credit - Twitter)

IND vs ENG: टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघाची निवड केली आहे. त्यांच्या मते, टीम इंडियाने एक फिरकी गोलंदाज आणि चार वेगवान गोलंदाजांसह जावे, या सूत्रामुळे २०२१ मध्ये इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाला यश मिळाले. याशिवाय, शास्त्रींनी (Ravi Shastri) कर्णधार शुभमन गिलच्या (Shubman Gill) फलंदाजीच्या क्रमातही मोठा बदल केला आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली (Virat Kohli) च्या अचानक निवृत्तीनंतर, भारतीय फलंदाजी युनिट खूप कमकुवत दिसत आहे. अशा परिस्थितीत, गिलला हा भार आपल्या खांद्यावर घ्यावा लागेल असे त्यांनी सुचवले आहे.

सलामीसाठी, शास्त्रींनी यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांना क्रीजवर सुरूवातीला पाठविण्याचे सुचवले. त्यांनी राहुलचा अनुभव आणि इंग्लंडमधील मागील यश हे महत्त्वाचे घटक म्हणून नमूद केले. शास्त्री म्हणाले, "हा भारतासाठी एक मोठा महत्त्वाचा दौरा आहे. त्यामुळे जयस्वाल आणि केएल राहुल सुरूवातीला असतील. गेल्या वेळी भारताने इंग्लंड दौरा केला होता तेव्हा त्यांनीच ओपनिंग केली होती. शतक झळकावले आणि चांगला दौरा केला. त्यामुळे मी त्याच्याकडून डावाची सुरुवात करण्याची अपेक्षा करेन."

शास्त्री यांनी तिसऱ्या क्रमांकावर तरुण साई सुदर्शनची शिफारस केली. ते म्हणाले, "तिसरे, मी तरुण साई सुदर्शनची निवड करेन. मी त्याच्याबद्दल जे काही पाहिले आहे, तो खूप प्रभावी आहे. या दौऱ्यात त्याच्यासाठी ही चांगली कामगिरी असेल." त्याच वेळी, त्यांनी नवनियुक्त कसोटी कर्णधार शुभमन गिलला विराट कोहलीच्या क्रमांक-४ स्थानावर जाण्यास सांगितले आहे. फलंदाजी युनिट मजबूत करण्यासाठी, माजी प्रशिक्षकांनी करुण नायरला पाचव्या क्रमांकावर आणि ऋषभ पंतला सहाव्या क्रमांकावर ठेवले आहे.

या दरम्यान, त्यांनी नायरच्या देशांतर्गत क्रिकेटमधील अलिकडच्या कामगिरीचे आणि राष्ट्रीय संघात त्याच्या पुनरागमनाचे कौतुक केले. शास्त्री म्हणाले, "सध्याच्या फॉर्मनुसार, करुण नायर उत्तम खेळण्याची शक्यता आहे. तो पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करेल. त्याला भारताकडून खेळून बराच काळ झाला आहे. पंत सहाव्या क्रमांकावर असेल." शास्त्री यांनी रवींद्र जडेजा यांना ७ व्या क्रमांकावर ठेवले आहे आणि ४ वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांची निवड केली आहे. ते म्हणाले की शार्दुल आणि नितीश रेड्डी यांच्यातील स्पर्धा कठीण असेल, परंतु कोण किती गोलंदाजी करतो हे तुम्हाला पहावे लागेल.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement