Guru Purnima 2019: गुरु रमाकांत आचरेकर यांची आठवण काढत सचिन तेंडुलकर झाला भावुक, Tweet करत मानले आभार
यामध्ये त्याने आचरेकर सरांसोबतचा एक फोटो देखील शेअर केला आहे.
आज गुरु पौर्णिमा. आज सर्व विद्यार्थी आपल्या गुरूच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतात. आपला शिष्य यशस्वी होऊ त्याचे जगभर कौतुक होणे हे कोणताही गुरुसाठी अतुलनीय असते. क्रिकेट जगतात देखील अशीच एक गुरु-शिष्य जोडी आहे जी आपल्याला सतत प्रेरणा देत असते. आणि ते म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि त्यांचे गुरु दिवंगत रमाकांत आचरेकर (Ramakant Achrekar). तेंडुलकरला घडवण्यात आचरेकरांचा मोलाचा वाटा आहे. आजच्या या खास क्षणी आपले गुरु आपल्या सोबत नाही हे सचिनला देखील पटत नाही. आजच्या दिवशी आचरेकर सरांची आठवण काढत, सचिन याने ट्विटरवर एक भावुक मेसेज शेअर केला आहे. यामध्ये त्याने आचरेकर सरांसोबतचा एक फोटो देखील शेअर केला आहे. (गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डी, अक्कलकोट, शेगावमध्ये भाविकांची तुफान गर्दी; चंद्रग्रहणामुळे दर्शनासाठी कमी वेळ)
"गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुः साक्षात् परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः ॥ गुरु तो शिष्याला अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढतो. धन्यवाद आचरेकर सर, माझे गुरु आणि मार्गदर्शन बनवण्यासाठी."
दरम्यान, जानेवारी 2019 मध्ये आचरेकर सरांचं मुंबईत निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. वांद्रे येथील निवास हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. भारतरत्न सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी (Vinod Kambli) यासारख्या महान क्रिकेटपटूसह असंख्य नामवंत क्रिकेटपटू घडवणारे प्रशिक्षक म्हणून रमाकांत आचरेकर यांची खास ओळख आहे.