RR vs MI IPL 2019 Live Cricket Streaming: मुंबई इंडियंस विरूद्ध राजस्थान रॉयल्स सामन्याचा लाईव्ह थरार पहा Star Sports आणि Hotstar Online वर!
होमपीचवर खेळत असणार्या राजस्थान संघाने टॉस जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे.
Rajasthan Royals vs Mumbai Indians Live Streaming and Score: जयपूरच्या सवाई माधवपूर स्टेडियम (Sawai Mansingh Stadium, Jaipur) वर आज मुंबई इंडियंस (Mumbai Indians) विरूद्ध राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) असा सामना रंगणार आहे. होमपीचवर खेळत असणार्या राजस्थान संघाने टॉस जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. मागील सामन्यात वानखेडे स्टेडियमवर मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला होता त्याचा बदला आज जयपूरमध्ये मुंबई इंडियंस घेणार का? हे पहाणं उत्सुकतेचं ठरणार आहे. आज राजस्थान संघ अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) ऐवजी स्टीव्ह स्मिथच्या (Steve Smith) नेतृत्त्वाखाली मैदानात उतरणार आहे. मुंबई विरूद्ध राजस्थान सामना टिव्हीप्रमाणेच हॉटस्टार (Hotstar Online) आणि स्टार स्पोर्ट्स वर देखील पाहता येणार आहे.
कुठे पहाल लाईव्ह सामना आणि स्कोअरकार्ड
आयपीएल 2019 चे ऑनलाईन पार्ट्नर्स हॉटस्टारवर आयपीएलचे सारे सामने लाईव्ह पाहण्याची सोय करण्यात आली आहे. मुंबई विरुद्ध राजस्थान या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहण्यासाठी येथे क्लिक करा. तर या सामन्याचा लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा. तर या सामन्याचा लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
मुंबई विरुद्ध राजस्थान टॉस
सध्या पॉंईट टेबलमध्ये मुंबई इंडियंस दुसर्या स्थानी आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकत पॉंईट टेबलवर अव्वलस्थानी राहण्याचा प्रयत्न करत मुंबई आणि राजस्थानमध्ये हा सामना नक्कीच चुरशीचा होणार आहे.
कसा असेल संघ?
राजस्थान: स्टीव स्मिथ (कर्णधार), अजिंक्य रहाणे, एश्टन टर्नर, संजू सैमसन, बेन स्टोक्स, स्टुअर्ट बिन्नी, जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपाल, रेयान पराग, जयदेव उनादकट आणि धवल कुलकर्णी
मुंबई: रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डिकॉक, सूर्यकुमार यादव, बेन कटिंग, क्रुणाल पांड्या, राहुल चहर, हार्दिक पांड्या, कीरोन पोलार्ड, जसप्रीत बुमराह, मयंक मार्कंडेय आणि लसिथ मलिंगा
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)