Road Safety World Series 2020 वर कोरोना व्हायरसचं संकट, पुणे ऐवजी मुंबई मधील डी.वाय. पाटील स्टेडियम वर रंगणार सामने

महाराष्ट्रात पुणे पाठोपाठ मुंबई आणि नागपूर शहरामध्ये कोरोनाग्रस्त रूग्ण आढळल्याने आता या सीरीजचे सामने closed doors खेळले जाणार आहेत.

DY Patil Stadium (Photo Credits: Wikimedia Commons)

सध्या जगभर धुमाकूळ घालणार्‍या कोरोना व्हायरस आता महाराष्ट्रात खेळल्या जाणार्‍या Road Safety World Series 2020 वर देखील पहायला मिळाले आहे. महाराष्ट्रात पुणे पाठोपाठ मुंबई आणि नागपूर शहरामध्ये कोरोनाग्रस्त रूग्ण आढळल्याने आता या सीरीजचे सामने closed doors खेळले जाणार आहेत. दरम्यान पुण्यात 8 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्याने आता पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर खेळला जाणारा सामना नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर खेळला जाणार आहे. तर कोरोना आता जागतिक आरोग्य संकट जाहीर झाल्याने उर्वरित सामने बंद स्टेडियम  (Closed Doors) खेळले जातील. दरम्यान 13 मार्च म्हणजे येत्या शुक्रवारपासून खेळले जाणार आहे. नव्या वेळापत्रकानुसार डी वाय पाटील स्टेडियमवर 13 मार्चला साऊथ आफ्रिका लेजंड्स विरूद्ध श्रीलंका लेजंड्स या सामन्याने सुरूवात होणार आहे.

Road Safety World Series 2020 मध्ये सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा आदि दिग्गज खेळाडू पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर उतरणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना या दिग्गजांमधील क्रिकेट पीचवरील स्पर्धा पुन्हा पहायला मिळणार याची उत्सुकता होती. या स्पर्धेत भारत, श्रीलंका, वेस्ट इंडीज, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियासह 5 देशांचे माजी खेळाडू सहभागी होत आहेत. तर 11 सामन्यांची मालिका रंगणार आहे. या सीरीजचा अंतिम सामना 22 मार्च रोजी खेळला जाईल.

दरम्यान पुण्यामध्ये 14 ते 20 मार्च दरम्यान Road Safety World Series 2020 च्या क्रिकेट सामन्यांचे आयोजन होते. मात्र आता ते डी. वाय पाटील स्टेडियमवर खेळले जातील. दरम्यान उर्वरित सारे सामने आणि अंतिम सामना देखील तेथेच खेळला जाणार आहे. असी माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.  दरम्यान हा सामना थेट पाहणं टाळणार असाल तर ऑनलाईन  जिओ क्रिकेट आणि व्हूट वर पाहता येणार आहे.