IPL 2019: 'मी फक्त लय पाहतो आणि...' रिषभ पंत याने सांगितले सिक्सर मारण्याचे राज
मी एकदा का लयीत आलो की समोर कोण गोलंदाज आहे हे पाहात नाही. मी थेट फटके मारायला सुरुवात करतो ' असे त्याने सांगितले. रिषभने आपली लय हेच आपल्या सिक्सरचे राज असल्याचे अप्रत्यक्षरित्या सांगितले.
Indian Premier League: इंडियन प्रीमियर लीग अर्थातच आयपीएल (IPL 2019) क्रिकेट स्पर्धेचे यंदा 12 वे पर्व. हे पर्व आता अंतिम टप्प्यात आले आहे. अंतिम टप्प्यातील महत्त्वाच्या लढतीत रिषभ पंत (Rishabh Pant याने दमदार कामगिरी करत दिल्ली कॅपिटल्स संघाला सनरायजर्स हैदराबाद संघाविरुद्ध जोरदार विजय मिळवून दिला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीनंतर पंत याचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. या वाढत्या आत्मविश्वासत पंत याने आपल्या सिक्सर ठोकण्यामागचे एक महत्त्वाचे कारणही सांगितले आहे.
रिषभ पंत याने हैदराबादविरुद्धच्या सामन्यात लगावलेले चौकार षटकार दिल्ली कॅपिटल्सच्या चांगलेच पथ्थ्यावर पडले. पंत याने केवळ 21 चेंडू आणि थेट 49 धावा अशी कामगिरी करुन दाखवली. या कामगिरीच्या जोरावरच दिल्ली कॅपीटल्स दोन गडी राखत हैदराबाद संघावर विजय मिळवू शकला. या कामगिरीनंतर त्याला सामनाविर म्हणून घोषीत करण्यात आले नसते तरच नवल. रिषभच्या धमाकेदार कामगिरीनंतर काही वेळाने सामना संपला आणि त्याला प्रसारमाध्यमांनी गाठले. आपल्या कामगिरीबद्दल भरभरुन बोलताना रिषभने आपल्या सिक्सर ठोकण्याच्या खास अंदाजाबद्दलही सांगितले. तो म्हणाला, 'सुरुवातीला मी फक्त स्वत:ला लयीत आणतो. मी एकदा का लयीत आलो की समोर कोण गोलंदाज आहे हे पाहात नाही. मी थेट फटके मारायला सुरुवात करतो ' असे त्याने सांगितले. रिषभने आपली लय हेच आपल्या सिक्सरचे राज असल्याचे अप्रत्यक्षरित्या सांगितले. (हेही वाचा, ICC Cricket World Cup 2019: अवघ्या 48 तासात विकली गेली भारत-पाकिस्तान सामन्याची तिकिटे)
दरम्यान, हैदराबाद संगाविरुद्ध खेळताना त्याने आपण केलेल्या खेळीबद्दलही सांगितले. तो म्हणाल आज हैदराबाद संघाविरुद्ध खेळताना आपण चेंडू जोराने टोलविण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही. चेंडूच्या टप्प्यावर मी बारीक नजर ठेवली. चेंडूचा टप्पा पाहून टायमिंग साधले आणि मगच तो टोलविण्याचा प्रयत्न केला. असे असले तरी, संघाला विजयासमीप नेऊन ठेवले असताना मोक्याच्या वेळी आपण बाद झाल्याची खंतही पंत याने बोलून दाखवली.