Photo Credit- X

RCB vs PBKS Narendra Modi Stadium Pitch Report IPL 2025 Final: आयपीएल 2025चा आज शेवटचा सामना ( IPL Final 2025) आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आरसीबी आणि पंजाब (RCB vs PBKS) यांच्यात जेतेपदासाठी स्पर्धा होत आहे. दोन्ही संघांनी इतिहासात पहिल्यांच आयपीएलच्या फायनलमध्ये धडक दिली आहे. ट्रॉफीवर कोण नाव कोरत हे पहायला सगळेच उत्सुक आहेत. चाहतेही आपापल्या आवडत्या संघाला सपोर्ट करताना दिसतील. आजचा अंतिम सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. मात्र त्याच्या अर्धा तास आधी, म्हणजेच संध्याकाळी 7 वाजता टॉस होणार असून दोन्ही संघाचे कर्णधार टॉससाठी मैदानात उतरतील. आजच्या सामन्यात खेळपट्टी तर महत्त्वांची भूमिका बजावणार आहे. पण नाणेफेकी जिंकणेही दोन्ही संघांसाठी महत्त्वाचे ठरेल. जाणून घेऊया आज पिच कसं असेल.

 

कसं असेल नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पिच?

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएलचा फायनल थरार होणार आहे. 2025 मध्ये या मैदानावर एकूण आठ सामने खेळले गेले आहेत. ज्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 6 सामने जिंकले आहेत. नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांना मदत करणारी आहे. रविवारी झालेल्या क्वॉलिफायर 2 मध्येही या मैदानावर खूप धावा झाल्या. मुंबई इंडियन्सने 203 धावा केल्या त्यावर पंजाबने ते आव्हान सहज पार करत मुंबईला हरवलं आणि अंतिम फेरीत सहज प्रवेश केला.

नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयपीएल मॅचचा रेकॉर्ड काय ?

आतापर्यंत या स्टेडियमवर आयपीएलचे एकूण 43 सामने खेळवले गेले आहेत. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 21 सामने जिंकले आहेत आणि दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाने 22 सामने जिंकले आहेत.

या मैदानावरील सर्वाधिक स्कोअर – 243 धावा

या मैदानावरील सर्वात कमी स्कोअर – 89 धावा

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: विराट कोहली, फिलिप सॉल्ट, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), रोमॅरियो शेफर्ड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, जोश हेजलवुड, सुयश शर्मा

पंजाब किंग्स: प्रियांश आर्य, जोश इंग्लिस (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, मार्कस स्टॉइनिस, शशांक सिंग, अजमतुल्ला उमरझाई, काइल जेमिसन, विजयकुमार विशाक, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल